Categories: इतर

…त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायलाच हवे

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा पार…

वर्धा हिंगणघाट: महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जात होती. कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला जात होता. मात्र हे सरकार आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. या सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपूरताच मर्यादित आहे. त्यामुळे या सरकारला वठणीवर आणायला हवे, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हिंगणघाट येथील कार्यकर्ता मेळाव्यात दिला.

मागच्या आठवड्यातच पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडले अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी. या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला धारेवर धरले. सरकारने घाबरुन घोषणा तर केली. परंतु अजून एक दमडीही या शेतकऱ्यांना दिली गेली नाही, असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी सरकारवर केला.

हिंगणघाटच्या तरुणाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड विश्वास आहे, याची अनुभुती आज तरुणांची गर्दी पाहून आली. हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पहात आहे. आपण त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, सर्व गटतट विसरुन आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण एकत्र आलो तर ही जागा राष्ट्रवादी हमखास जिंकणार असा विश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सरकारशी संघर्ष करायचा असेल तर कार्यकर्त्यांची मोठी फौज आपल्याला लागेल. त्यासाठी सभासद नोंदणी तात्काळ पूर्ण करा. सर्वांनी एकत्र येऊन सभासद नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. आज महाराष्ट्राला सर्वात जास्त विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे. आपल्याकडे पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचे विचार आहे. या विचारांच्या जोरावरच आपण हा पक्ष बांधायचा आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने, तरुणांच्या ताकदीने हा गड आपण पुन्हा राष्ट्रवादीमय करु, असा आशावादही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

या कार्यकर्ता मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर गमे, प्रवीण कुंटे पाटील, अतुल वांदिले, महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई देशमुख, महिला शहराध्यक्षा मृणालताई टिळे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

9 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

17 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago