आरोग्य

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत असतात. याउलट बरेच दिवस कोणताही व्यायाम न केलेल्या व्यक्तीच्या नाडीचे ठोके अगदी माफक श्रमांनीदेखील भरभर पडू लागतात. चालताना अगदी पावलांपासून खांद्यापर्यंतचे अनेक स्नायू कार्यान्वित होतात.

प्रत्येक स्नायूच्या आकुंचनाबरोबर स्नायूत असणारं रक्त नीलांमधून हृदयाकडे पाठवलं जातं. त्यामुळे हृदयाकडे येणार्‍या रक्ताचं प्रमाण बरंच वाढू लागतं. याचा परिणाम नाडीची व श्वसनाची गती वाढण्याकडे होतो. अशी वाढलेली गती हृदयाच्या स्नायूंना व्यायाम घडवते. असा व्यायाम दररोज अर्धा तास आठवड्यातले पाच दिवस केला तर रुधिराभिसरण आणि श्वसन या दोन्ही संस्था अधिकाधिक कार्यक्षम होऊ शकतात.

दुसरीकडे अजिबात दमछाक न होता पण अधिक काळ काम करत राहता यावं, या उद्देशाने जे व्यायाम करता येतात, त्यात व्यायाम करताना नाडीची गती फारशी वाढण्याची आवश्यकता नसते. उलट ते संथ गतीने केले तरच ते दीर्घकाळ करता येतात. संथ चालताना स्नायूंवर, सांध्यांवर, पाठीच्या कण्यावर, श्वसनावर ताण येत नाही. स्नायूंना आपलं काम करण्यास लागणारी ऊर्जा प्राणवायूचा वापर करून मिळवता येते. चयापचयावरही ताण येत नाही. म्हणूनच असं सांगितलं जातं की, संथ गतीने आठवड्याला आठ ते दहा तास चालणं हा वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय ठरू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago