आरोग्य

लहान बाळांचा आहार कसा असावा…

आहाराचे संस्कार घरातूनच

लहान मुलांच्या आहाराबाबत सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्यांची आहाराची बदलती गरज. वाढत्या वयानुसार आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण वाढत जातं. त्यांच्यावर आहाराचे संस्कार घरातूनच सुरू होतात. एखाद्या पदार्थाची निवड, आहारातील वेगेवेगळे समज- गैरसमज यांची सुरुवात घरापासून होते, त्यामुळे पालक म्हणून आहाराबाबत सजग असणं आवश्यक असत.त्याला पालेभाज्या आवडतंच नाहीत.आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय त्याचं जेवणचं पूर्ण होत नाही”…ती फक्त भातच खाते. या लाडीक तक्रारीतून मुलांना बाहेर काढून सकस आहाराचं महत्त्व समजावणं आवश्यक असतं.

किडलेले दात…

लहान मुलांच्या आहारशैलीवर पालकांचा होणार परिणाम सांगताना आणखी एक किस्सा आठवतोय. २०२० साली सहा वर्षाच्या आद्याला तिचे पालक माझ्याकडे घेऊन आले होते. तिचे सगळे दात वेगेवेगळ्या रंगाचे होते. तिचे दुधाचे दात पूर्णपणे किडल्यामुळे दंतवैद्यानी सगळे दात काढून नवे रंगीत दात बसवून दिले होते. तिला पूर्णवेळ फक्त द्रव पदार्थ खाण्याची अटकळ असल्यामुळे तिचे पालक आहारात काय काय हवंय याचा सल्ला घेण्यासाठी आले होते. तिच्या दातांबद्दल सांगताना मिहीर त्रासून म्हणाला “कसं काय माहीत माझी कोक प्यायची सवय इतकी पटकन लागली तिला. पाण्याऐवजी फक्त कोक आणि पेप्सी इतकंच प्यायची, त्याने एवढं नुकसान होईल वाटलं नव्हतं.

सकस आहाराचं नियोजन…

मिहीर हे सांगताना आद्याच्या आईच्या- स्वातीच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. “तरी मी तुला सांगत होते. तिच्यासमोर कोक पेप्सी नको. पण माझं ऐकशील तर खरं. रोज चॉकलेट, जेवल्यानंतर चॉकलेट शेक, पाणी तर नकोच असतं तिला.” स्वाती नाराज स्वरात म्हणाली. आणि लहानखुरी आद्या… तिच्या विश्वात मात्र हे सगळंच नवीन होतं. आपले दात तर रंगीत आहेत, हे वेगळं आहे. पण नेमकं काय चुकलंय याबद्दलच निरागस कुतूहल होतं. तिच्या आहारातील बदल सुचवताना फक्त स्ट्रॉ वापरण्याचा सल्ला असल्यामुळे सकस आहाराचं नियोजन करणं थोडं आव्हानात्मक होतं.

वाढीसाठी पोषक आहार…

आद्याचं उदाहरण पाहता लहान मुलांच्या आहारात केवळ फॅड म्हणून नव्हे तर सवय म्हणून सकस आहाराची सुरुवात पालकांपासून व्हायला हवी, हे अधोरेखित होत राहतं. पाश्चात्त्य जीवनशैली अंगिकारताना आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थांबद्दल त्यांच्या आहारातील वापराबद्दल आपण आग्रही असायला हवं. लहान मुलांच्या वाढीसाठी पोषक आहार आवश्यक आहे, म्हणजे नेमकं कसं ते जाणून घेऊ.

वाढतं वजन हे परिमाण…

नवजात अर्भकाचा वजन पहिले ६ महिने ते एक वर्षापर्यंत वाढतं. या वयात पोषक तत्त्वांची आवश्यकता इतर कोणत्याही वयोगटापेक्षा अधिक असते. आईच्या दुधामधून आवश्यक संप्रेरके, प्रथिने यांचा पुरवठा होतोच . मात्र जेव्हा मूल हळूहळू अन्न पदार्थ खायला शिकतं, तेव्हा त्यांच्या आहारात कॅल्शिअम, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, लोह, झिंक, व्हिटॅमिन्स (पोषणमूल्यं) आणि खनिजे यांचे प्रमाण उत्तम असणे आवश्यक असते. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढणे, हाडांची वाढ होणे, मेंदूला चालना मिळणे, ऊर्जेचा भरपूर पुरवठा होत राहणे, शरीरातील पेशींची वाढ उत्तम होणे आणि पेशींचे आरोग्य उत्तम राहणे यासाठी आहार महत्वाचा आहे. बाळाचे आरोग्य उत्तम असण्याचं एक परिमाण म्हणजे बाळाचं वाढतं वजन! पहिल्या सहा महिन्यात सरासरी ६ ते ८ किलो आणि एक वर्षापर्यंत सरासरी ११ किलोग्रॅम इतके वजन वाढणे अपेक्षित असते. अर्थात त्यासाठी आईचा आहारदेखील तितकाच महत्वाचा असतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

2 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

5 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

5 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

5 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

5 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

5 तास ago