आरोग्य

मुलांना जेवताना टीव्ही-मोबाईल स्क्रीन बघत जेवण्याची सवय बंद करण्यासाठी घरगुती उपाय

घरातले सगळे जण रात्री एकत्र बसून, एकमेकांशी गप्पा मारत जेवत आहेत, असं चित्र आता क्वचितच एखाद्या घरात दिसतं. दिवसभर सगळे कामानिमित्त, शाळेमुळे घराबाहेर असतात. त्यामुळे दुपारी एकत्र येऊन जेवण करणं जमत नसल्याने रात्री आवर्जून सगळे वेळ काढून एकत्र बसतात, असं चित्र काही वर्षांपुर्वी घरोघरी असायचं ते मात्र आता दुर्मिळ झालं आहे. पालकच मोबाईल आणि टीव्ही बघत जेवण करतात. तिथे लहान मुलांची काय कथा.. पण मुलांची ही सवय तोडायला हवी असं आहारतज्ज्ञ, डॉक्टर वारंवार ओरडून सांगतात. पण मुलं टीव्ही आणि मोबाईलच्या एवढी आहारी गेली आहेत की त्यांची ती सवय आता काही सुटत नाही. अशावेळी काय करावं जेणेकरून त्यांचं टीव्ही, मोबाईल बघत

मुलांची टीव्ही, मोबाईल बघत जेवण्याची सवय बंद व्हावी म्हणून उपाय

१) जेवायला मागेपर्यंत देऊ नका

बऱ्याचदा पालक मुलांना घड्याळाची वेळ पाहून जेवायला देतात. पण जर तुम्हाला मुलांची टीव्ही, मोबाईल बघत जेवण करण्याची सवय मोडायची असेल तर ते जोपर्यंत जेवायला मागत नाहीत तोपर्यंत त्यांना जेवायला देऊ नका. कारण जेव्हा खरोखर कडाडून भूक लागते तेव्हा टीव्ही- मोबाईल असं काही लागत नाही. मुलं तुमच्याशी वाद न घालता निमूटपणे जेवायला बसतील.

२) गोष्टी सांगा, गप्पा मारा

मुलांना एकटं जेवायला आवडत नसतं. त्यांना जेवताना काहीतरी विरंगुळा हवा असतो. त्यामुळे मुलं जेव्हा जेवायला बसतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढा. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना शाळेत, ट्यूशनमध्ये, क्लासमध्ये काय झालं ते विचारा. तुम्हीही दिवसभरात काय काय केलं, काही गमतीजमती झाल्या असतील तर त्या सांगा. गप्पा मारण्यात मुलं रमत गेली की टीव्ही, मोबाईलपासून दूर जातील. पुर्वी एकत्र बसून जेवण करताना हेच तर सगळं होत होतं..

३) वेगवेगळ्या वस्तू दाखवा

जर तुमची मुलं अगदी १ ते ४ वर्षांची असतील तर अशा मुलांना जेऊ घालताना बाल्कनीमध्ये किंवा अंगणात न्या. तिथे त्यांना वेगवेगळी झाडं, फुलं, पक्षी, फुलपाखरं, कुत्रा- मांजर असे प्राणी दाखवा. एखाद्या पुस्तकातली चित्रं दाखवा, गाणी म्हणा, गोष्टी सांगा आणि अशा पद्धतीने त्यांचं मन रमवत जेऊ घाला. काही दिवस करून पाहा.. मुलांना टीव्ही, मोबाईलची आठवणही येणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी? लोखंडी गजांच्या वापराबाबतही संशय, नागरिकांचा संताप अनावर…

शिक्रापूर (तेजस फडके) : शिक्रापूर ते मलठण या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा सुरूच असून, रस्ता…

4 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात ७० लाखांची खंडणी मागून महाविद्यालयाला वेठीस धरण्याचा प्रयत्न! एकाची थेट येरवडा कारागृहात रवानगी…

शिरूर (तेजस फडके) : शिक्षण संस्थेच्या नावाने दबावतंत्राचा खेळ खेळायचा, विद्यापीठापासुन विविध शिखर परिषदांपर्यंत तक्रारींची…

20 तास ago

शिरूर! लाचखोर हवालदार गजाआड; मात्र लाचखोरीच्या ‘वरिष्ठ सूत्रधारां’चा शोध सुरु…

शिरूर, (अरुणकुमार मोटे) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर…

2 दिवस ago

आयुर्वेदातील या टिप्स ने आता दुखण करता येईल मुळपासून दुर

तुमचे जाँईन्ट दूखतायत,कटकट आवाज येतो,कंबर पाठ मान ,पाय ,पोटरी, टाचा दुखत आहेत. आयुर्वेद याला वात…

3 दिवस ago

सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!

संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’ मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…

3 दिवस ago

वाढवण बंदराचा हट्ट भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर घाला; प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा!

पोलीस दडपशाही थांबवून आंदोलकांशी चर्चा करा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मुंबई: वाढवण बंदर…

3 दिवस ago