आरोग्य

हायपोथायरॉईडीझमसाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर, जाणून घ्या सोप्या पद्धत

बहुतेकांमध्ये सध्या बिघडलेली जीवनशैली आणि असंतुलित आहार यामुळे थायरॉईडचा त्रास बळावलेला दिसतो. जेव्हा आपल्या थायरॉईड ग्रंथी पुरेसे हार्मोन्स तयार करत नाहीत, तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो. त्यामुळे आपले चयापचय मंदावते. शिवाय थकवा, वजन वाढणे, थंडी वाजणे, केस गळणे आणि मूड बदलणे अशी लक्षणे दिसतात. आयुर्वेद या स्थितीचा संबंध कमकुवत पचनसंस्थेशी असल्याचे सांगते. या परिस्थितीसाठी काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय खूप फायदेशीर ठरू शकतात.

अश्वगंधाचा वापर

अश्वगंधा ही एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, जी थायरॉईड हार्मोन्सना संतुलित करते आणि तणावासाठी कारणीभूत हार्मोन कॉर्टिसोल कमी करते. दररोज अर्धा चमचा अश्वगंधा पावडर कोमट दुधासोबत घेतल्याने ग्रंथी मजबूत होतात. त्रिफळा पावडर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून पचनक्रिया सुधारते आणि लिव्हरला विषमुक्त करते, त्यामुळे हार्मोन्स तयार होण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत ते घेणे अत्यंत फायदेशीर आहे.

कंचनार, आलं आणि लसूण

कंचनार गुग्गुळू हे थायरॉईडमधील जळजळ आणि आळस कमी करते आणि कफ, फॅटचे प्रमाण कमी करते. आल्यामध्ये पाचन उत्तेजक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात, ते थायरॉईडमध्ये रक्त प्रवाह वाढवतात आणि चयापचय सक्रिय ठेवतात. लसूण थायरॉईड एन्झाइम्स सक्रिय करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया वेगवान करते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत लसणाच्या २ ते ३ पाकळ्या खाणे फायदेशीर आहे.

मेथी दाने

मेथीचे दाणे हार्मोन्स आणि रक्तातील साखर संतुलित करतात, लिंबू पाणी शरीराला विषमुक्त करते आणि वात-कफ दोष संतुलित करते. नारळाच्या तेलातील मध्यम साखळी फॅटी अ‍ॅसिड थायरॉईडला उत्तेजित करतात आणि ऊर्जा वाढवतात. तुळस आणि दालचिनी एकत्रितपणे कॉर्टिसोल कमी करतात आणि चयापचय वाढवतात.

योग

योग आणि प्राणायम अत्यंत महत्त्वाचे आहेत. सूर्यनमस्कार घशामधील रक्तप्रवाह वाढवतात, तसंच भ्रामरी, उज्जयी आणि अनुलोम-विलोम प्राणायम ग्रंथींना सक्रिय करतात. नियमित सरावाने थायरॉईड संतुलित होते, शरीराची ऊर्जा वाढते आणि मन शांत होते. या उपायांमुळे हायपोथायरॉईडीझमशी संबंधित लक्षणे हळूहळू सुधारू शकतात, मात्र कोणतेही आयुर्वेदिक औषध किंवा उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

9 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

14 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

15 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

15 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

15 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago