आरोग्य

रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पौष्टिक ऑप्शन ठरतील फायदेशीर

योग्य अन्नपदार्थांनी सकाळची सुरुवात केल्याने इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यात आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकते.

‘या’ पदार्थांपासून करा सकाळची सुरुवात

कोमट पाणी: एका ग्लास कोमट पाण्याने करण्याची शिफारस केली आहे. “तुम्ही कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रसदेखील घालू शकता. लिंबाचा रस घालताना काळजी घ्या. कारण- ते आम्ल आिहे आणि त्यामुळे मायग्रेन किंवा सायनुसायटिसचा त्रास होऊ शकते. ते तुमचे पचन सुरू करण्यास मदत करू शकते आणि रक्तातील साखर न वाढवता तुमचे शरीर हळुवारपणे जागृत करू शकते.

ग्रीन स्मूदी: जर तुम्हाला काही समाधानकारक हवे असेल, तर भाज्यांच्या स्मूदी पालक, काकडी वा पुदिना यांनी सुरूवात करा. ताज्या हिरव्या भाज्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात.

बेरी: ब्ल्यूबेरी, स्ट्रॉबेरी व रास्पबेरीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

अंडी: प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थांनी समृद्ध असलेले अंडे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास आणि जास्त काळ पोट भरलेले असल्याची भावना ठेवण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील चढ-उतार कमी करता येतो.

ग्रीक दही: ग्रीक दही आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रो-बायोटिक्स आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी प्रथिने प्रदान करते. “साध्या ग्रीक दह्याची एक छोटी वाटी तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी पुरेसे प्रथिने आणि चांगले जीवाणू प्रदान करू शकते, जे इन्सुलिन प्रतिरोध व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. परंतु, यासाठी साखरेशिवाय पूर्ण चरबीयुक्त किंवा कमी चरबीयुक्त दही निवडावे.

मेथीचे पाणी: एक ग्लास मेथीचे पाणी प्या. मेथीच्या एक चमचा बिया रात्रभर भिजवून, सकाळी ते पाणी पिता येते. त्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.

ओट्स: स्टील-कट किंवा रोल केलेले ओट्स विरघळणारे फायबरने समृद्ध असतात, जे पचन मंदावते आणि रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करते. बहुतेकदा जास्त प्रक्रिया केलेले ओट्स टाळा.

अ‍ॅव्होकॅडो: तुमच्या नाश्त्यात उदाहरणार्थ- संपूर्ण धान्याच्या टोस्टवर, अ‍ॅव्होकॅडो घातल्याने निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मिळतात, जे इन्सुलिनची क्रिया वाढवतात. अ‍ॅव्होकॅडोचे काही तुकडे खाल्ल्याने किंवा ते स्मूदीमध्ये टाकून खाल्ल्याने निरोगी फॅट्स मिळू शकतात, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास मदत करतात.

ड्रायफ्रुट्स: मूठभर बदाम आणि २-३ अक्रोड फायबर, मॅग्नेशियम व निरोगी चरबी देतात, जे रक्तातील साखर नियंत्रणासाठी फायदेशीर आहेत. सकाळी मूठभर भिजवलेले ४-५ बदाम खावेत. “भिजविलेले बदाम निरोगी चरबी आणि फायबर प्रदान करतात, जे रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तुमच्या सकाळच्या नाश्त्यात वरील काही पदार्थ मिसळणे सोपे आणि स्वादिष्ट असू शकते. बेरी आणि ग्रीक दही, अंडी आणि अ‍ॅव्होकॅडो टोस्ट, ओट्स हे दररोज इन्सुलिन संवेदनशीलता वाढविण्याचे सोपे मार्ग आहेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

50 मिनिटे ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

58 मिनिटे ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

1 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

18 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

18 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

18 तास ago