राजकीय विधान करणाऱ्यांना या स्थानावर बसण्याचा अधिकार आहे का
मुंबई: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव दिले होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. यावर विरोधकांनी विधानसभेत आक्षेप घेतला.
या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तरी कामकाज सुरू ठेवले होते. पण काही सदस्य उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या स्थानावर बसून सरकारची भूमिका मांडली, असा त्यांना अधिकार आहे का? अध्यक्ष पदाची एक गरिमा आहे अस असताना तिथून राजकीय भाषण होणे योग्य नाही, तीस वर्ष या सभागृहात काम करताना असा प्रकार घडलेला नाही अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
तालिका सभाध्यक्ष बसले असले तरी त्यांना अध्यक्ष म्हणून मानून मान दिला जातो पण विरोधी पक्षातील काही सदस्य उपस्थित नाही म्हणून राजकीय टिपण्णी केली जाते. जेव्हा की सभागृहाचे कामकाज नीट व्हावे ही जबाबदारी सरकारची असते, ज्या विभागाचा प्रस्ताव असतो त्या विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित आहेत की नाही हे पाहणे संसदीय कामकाज मंत्र्यांचे असते. अश्यावेळी सभागृहात सर्वोच्च स्थानावरून सभागृहाची प्रथा परंपरा किंवा संकेत पाळले पाहिजे. राजकीय भाष्य करणाऱ्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली. संविधानाने दिलेल्या आदेशाने जे नियम आहेत त्या चौकटीत राहून पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिले.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…