आरोग्य

आयुर्वेदातील चिकित्सा पध्दती

सध्याच्या काळात आजाराच्या मुळाशी जाऊन आजार दूर करणारी आयुर्वेद चिकित्सा पध्दती जास्त गुणकारी आहे. आजार कायमचा बरा करणारी आयुर्वेदातील चिकित्सा पध्दती म्हणजे विद्धकर्म व अग्निकर्म.

एखाद्या पिझ्झा खाणाऱ्या लोकांना पिझ्झा बद्दल अतीव आकर्षण असते. त्यातले चीझ, मैदा, अतिरिक्त कॅलरीज, बेक केल्यामुळे पचण्यास जड असे कितीही तोटे असले तरीही हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्याच प्रमाणे वेदनाशमन करणारी औषधे आरोग्यासाठी नुकसानकारक असली तरीही पिझ्झा प्रमाणेच रोज खावी वाटतात, परंतु आजाराच्या मुळाशी जाऊन आजार दूर करणारी आयुर्वेद चिकित्सा पध्दती नको असते. आजार कायमचा बरा करावा यासाठी सवड नसणाऱ्या लोकांना कानउघाडणी करणारी चिकित्सा म्हणजे विद्धकर्म व अग्निकर्म. ही चिकित्सा अजूनही जनमानसात रुजू झालेली नाही. त्याचे कारणही तसेच आहे. आयुर्वेद वैद्य या चिकित्सेबद्दल अभ्यासतो, परंतु ही चिकित्सा करण्यासाठी जे प्रशिक्षण लागते त्याच्या अभावामुळे आपल्या जवळील आयुर्वेद वैद्य ही चिकित्सा अवलंबताना दिसत नाहीत.

विद्धकर्म: हृदयातील रक्तवाहिनी मधील गाठी काढल्यानंतर जसा रक्तपुरवठा परत सुरू होतो आणि मृत्यू समीप पोहोचलेल्या व्यक्तीला जीवन मिळते, त्याचप्रमाणे रक्त पुरवठा, रक्तामधील वात-पित्त-कफ दोष इत्यादी दूषित झाल्यानंतर शरीरात जे आजार तयार होतात त्या आजाराचे कारण असलेल्या रक्ताला शुध्दीकरण करणे, त्याला मार्ग मिळवून देणे म्हणजे विद्ध चिकित्सा. ही चिकित्सा आयुर्वेदातील पंचकर्मा मधील रक्तमोक्षण या चिकित्सेचा भाग आहे. या रक्तमोक्षण चिकित्सेत जळवा लावणे, श्रुंग लावून रक्त काढणे, अलाबू अथवा कोहळा लावून रक्त काढणे हे केले जाते. या विद्धकर्म चिकित्सेत एक छोटीशी सुई वापरून शरीरातील विशिष्ट भागात विशिष्ट प्रमाणात आत टाकून तेथील अडकलेला वायू, रक्त, द्रव संचिती यांना मार्ग मिळवून दिला जातो आणि कष्टाने बरे होणारे विकार लगेच बरे केले जातात. म्हणजे सूक्ष्म विद्ध केले असता अव्यक्त स्वरूपात रक्तमोक्षण होऊन आजार मुळापासून बरे होतात. आपल्या मानवी शरीरात १०७ अशा जागा आहेत, ज्यांना आयुर्वेदात मर्म म्हणतात. त्या जागांच्या ज्ञानाचा वापर करून ही चिकित्सा आलेली आहे. अशा या सर्व मर्मस्थानाचा विचार करूनच प्रत्येक व्याधी मध्ये विद्धकर्म चिकित्सेने अगदी अल्प काळात रुग्णाला बरे वाटते.

अग्निकर्म: जो व्याधी औषधांनी बरा नाही होत, त्यावर शास्त्रकर्म करतात, जो शास्त्रकर्म करून बरा नाही होत त्यावर अपुनर्भ चिकित्सा म्हणजे अग्निकर्म आहे. अग्नी म्हणजे आग, तेज तत्त्व याचा वापर करून आजार समूळ नष्ट केला जातो. आज कर्करोगावर Radiation or Chemotherapy केली जाते ते अग्निकर्म आहे. शास्त्रकर्म करताना एखाद्या रक्तवाहिनी मधील रक्तस्राव थांबविण्यासाठी cautary वापरली जाते, तेही अग्निकर्म आहे. पायात काटा मोडून कुरूप आले असता त्याला गुळाने, बिब्ब्याने अथवा गरम लोहशलाकेने जाळून टाकणे म्हणजे अग्निकर्म आहे. चेहऱ्यावर मस, जामखीळ, तीळ आले असता ते मायक्रो अग्निकर्म करून काढून टाकले जाते. दात दुखत असताना त्यावर आयुर्वेदातील लाखेने अग्निकर्म केले असता रूट कॅनलची गरज नाही पडत अथवा फिलिंगची गरज नाही पडत. अग्नी या तत्त्वाचा वापर करून शरीरातील आजार बरा करण्यासाठी वापर केला जातो.

सुवर्णशलाका: सोन्याची शलाका ही विशेषत हाडांच्या विकारावर वापरतात. पूर्वी राजे-महाराजे लोक युध्दात मार लागला असता तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रत्येक सांध्यावर सोने घालत होते. सोने हा एकमेव धातू आहे, जो शरीरामधील धातूंचे पोषण करतो. याच धातूची शलाका बनवून अग्निकर्म केले असता वाताच्या आजारावर उत्तम कार्य होते.

मृत्तिका शलाका: मातीची शलाका बनवून टाचेचे हाड वाढलेले असता त्या ठिकाणी शेक दिला जातो आणि शास्त्रकर्म करूनही बरे न होणारे टाचेचे हाड लगेच बरे होते.

हळकुंड: कावीळ जर कोणत्याही औषधाने उतरत नसेल तर अग्निकर्माचा वापर करून व्यक्तीचे लिव्हर वाचते.

लोहशलाका: याने हातापायांवर आलेले कुरूप जाळले जातात.

चांदीची शलाका: शरीरातील मज्जासंस्थेचे आजार बरे करण्यासाठी वापरले जातात.

रत्न अग्निकर्म: अध्यात्म वापरून काही व्याधींवर चिकित्सा केली जाते. त्याला दैवव्यापाश्राय चिकित्सा म्हणतात. या चिकित्सेत रत्न वापरून राशीनुसार अग्निकर्म करतात.

अग्निकर्म म्हणजे अघोरी चिकित्सा नव्हे. ही चिकित्सा आयुर्वेद ग्रंथात वर्णित केलेली शास्त्रीय चिकित्सा आहे. फक्त आयुर्वेद चिकित्सा करणाऱ्या वैद्याला ही कशी करायची हे माहिती नसल्याने याचे जनमानसात महत्त्व समजलेले नाही. या दोन्ही विद्धकर्म आणि अग्निकर्म चिकित्सा शरीररचनेचे ज्ञान असलेला तसेच आयुर्वेद शास्त्र जाणणारा व्यक्तीच करू शकतो. ज्याप्रमाणे युट्युबवर अपेंडिक्सचे ऑपरेशन पाहून आपण करत नाही त्याप्रमाणे इतर लोकांनीही याचे ज्ञान नसताना वापर करू नये. ही विद्धकर्म अग्निकर्म चिकित्सा कायम फलदायी म्हणण्याचे कारण म्हणजे रुग्ण वेदनाशामक औषधी विकत आणेपर्यंत रुग्ण बरा होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

4 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

4 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

4 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

4 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

6 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

8 तास ago