आरोग्य

शारीरिक कमकुवतपणा नाही तर दृष्टीवरसुद्धा परिणाम करेल ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

प्रथिने, कॅल्शियम आणि लोह हे पोषक घटक जसे चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असतात, तसेच व्हिटॅमिन बी १२ देखील आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, हाडांचा कमकुवतपणा, हातापायात मुंग्या येणे, मूड स्विंग किंवा नैराश्य येऊ शकते.

व्हिटॅमिन बी १२ची पातळी ज्यावेळी खूपच कमी होते, तेव्हा ते डोळ्यांमार्फत मेंदूला माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला नुकसान पोहोचवू शकते. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे अंधुक दृष्टी, दुहेरी दृष्टी आणि तेजस्वी प्रकाशामुळे अस्वस्थता येऊ शकते.

गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे ऑप्टिक न्यूरोपॅथी नावाची स्थिती उद्भवू शकते, त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे या व्हिटॅमिनची कमतरता होऊ नये याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दरम्यान, व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेची अनेक लक्षणे तुमच्या डोळ्यांमध्ये दिसू शकतात, तेव्हा ती दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

व्हिटॅमिन बी १२चा डोळ्यांवर परिणाम

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एक अहवालानुसार, व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे डोळ्यांवर बरेच परिणाम होऊ शकतात. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे मेंदूला माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते. जेव्हा नर्व्हवर परिणाम होतो, तेव्हा दृष्टी कमी होते आणि विविध समस्या उद्भवू लागतात.

अस्पष्ट दृष्टी

व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेचे पहिले लक्षण म्हणजे अंधुक किंवा अस्पष्ट दृष्टी. एखाद्या व्यक्तीला स्पष्ट दिसत नाही किंवा खूपच अंधुक दिसतं. काहीवेळा अक्षरे किंवा चेहरे ओळखणे कठीण होऊ शकते.

प्रखर प्रकाशाची समस्या

प्रखर प्रकाशामुळे होणारा त्रास ही देखील एक सामान्य समस्या आहे. डोळे प्रकाशाप्रती अधिक संवेदनशील होतात. अगदी थोडासा तेजस्वी प्रकाश किंवा सूर्यप्रकाश देखील डोळे दुखवू शकतो. त्यामुळे डोळे बंद होण्याची किंवा वारंवार डोळे मिचकवण्याची सवय लागते.

डोळ्यांमध्ये जळजळ

काही लोकांना डोळ्यांत सतत जळजळ किंवा चोळावेसे वाटते. डोळ्यांमध्ये धूळ किंवा लहान कण अडकल्यासारखे वाटते. यामुळे डोळ्यांना सतत खाज सुटणे, जळजळ होणे किंवा लालसरपणा येऊ शकतो.

दुहेरी दृष्टी

बहुतेक प्रकरणांमध्ये दुहेरी दृष्टीची देखील समस्या निर्माण होते. याचा अर्थ असा की, एखाद्या व्यक्तीला दोन गोष्टी दिसतात, त्यामुळे गोंधळ किंवा डोकेदुखी होऊ शकते. यावरून असे दिसते की, व्हिटॅमिन बी १२ची कमतरता वाढली आहे आणि डोळ्यांमधील नसा योग्यरित्या काम करत नाहीत.

या समस्यांसाठी काय करावे

जर ही लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिली, तर ती गंभीर समस्या दर्शवू शकतात. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि व्हिटॅमिन बी १२ चाचणी करणे महत्त्वाचे आहे. वेळेवर उपचार केल्याने दृष्टी टिकून राहण्यास आणि पुढील नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते. याव्यतिरिक्त तुमच्या आहारात दूध, अंडी, दही, मासे आणि फोर्टिफाइड तृणधान्यांचा समावेश करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

11 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

14 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

16 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

16 तास ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

17 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

17 तास ago