आरोग्य

जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला; वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे…

जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो.

जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते.

जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून राहण्याचे प्रमाण घटते.

चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदय निरोगी राहण्यासही मदत होते.

जेवण झाल्यानंतर चालल्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन कमी होण्यास मदत होते तसेच एंडोमॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे पॉझिटीव्ह हार्मोन्स वाढतात. त्यामुळे ताण कमी होतो. रिलॅक्स वाटते.

ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनीही जेवण झाल्यानंतर काही मिनिटांसाठी नियमितपणे चालावे. कारण चालल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण कमी होत असल्याने मन, शरीर रिलॅक्स होऊन चांगली झोप लागते.

(सोशल मीडियावरून सभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

13 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

13 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

13 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

13 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

13 तास ago