आरोग्य

डायबिटीस कशामुळे होतो

मधुमेह आता एक जागतिक आव्हान बनले आहे. जो फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो. अलीकडेच एका अभ्यासाच्या मदतीने म्हातारपणात मधुमेहाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये स्वादुपिंडातील काही अंतःस्रावी पेशींच्या नुकसानाबाबत संशोधन करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी

मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सुमारे ४२.२ कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे. टोकियो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीच्या काही संशोधकांनी वाढत्या वयामुळे होणाऱ्या मधुमेहाविषयी अभ्यास केला आणि त्यांना असे काहीतरी सापडले, जे वृद्धांमध्ये मधुमेह टाळण्यास मदत करू शकते.

स्वादुपिंड हा इंसुलिन सोडून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, मधुमेहाचा धोका वाढतो. या पेशी अंतःस्रावी पेशी आहेत, जे इंसुलिन हार्मोन तयार करतात. वाढत्या वयानुसार, या पेशी नष्ट होऊ लागतात, ज्यामुळे वृद्धत्वात मधुमेह होऊ शकतो.

अभ्यासात वय आणि जीवनशैली आधारे मधुमेह होण्याचा धोका किती असतो याबाबत निरीक्षण करण्यात आले. यामध्ये असे समोर आले की, या पेशींची हानी महिलांमध्ये अधिक होते. या पेशींचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्यामुळे मधुमेह होण्यापासून बचाव होऊ शकतो.

व्यायाम करा

व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते. यामुळे आपली चयापचय क्रिया देखील चांगली राहते. व्यायामामुळे आपल्या पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता देखील वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यात ही व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

वजन कमी

जास्त वजन हे मधुमेहाचे एक प्रमुख घटक आहे. तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी आहाराचे नियोजन करू शकता. यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.

जेवणावर नियंत्रण ठेवा

जेवताना अनेक वेळा आपण एकाच वेळी खूप जेवतो. नंतर बराच वेळ काहीही खात नाही. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. त्यामुळे मधुमेहाचा धोका असतो. एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या अंतराने थोडे जेवण घ्या.

धूम्रपान करू नका

धूम्रपानामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्या शरीरातील पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहात नाही. म्हणून, जर तुम्ही धूम्रपान करत असाल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही धूम्रपान करत नसल्यास, निष्क्रिय धूम्रपान देखील टाळण्याचा प्रयत्न करा..

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

48 मिनिटे ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

53 मिनिटे ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

56 मिनिटे ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

1 तास ago

राज्याच्या आरोग्य यंत्रणेला मिळणार मोठे बळ! एकाच वेळी १,४४० वैद्यकीय अधिकारी सेवेत दाखल;

मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आज ऐतिहासिक नोंद झाली आहे. एकाच वेळी तब्बल १,४४० नवनियुक्त…

1 तास ago

महामार्ग सुरक्षेच्या लोकशाही लढ्याला कायदेतज्ज्ञांची साथ!

१३ दिवसांच्या आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यांत न्यायालयीन दिलासा; अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन कायम शिरूर: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय…

1 तास ago