आरोग्य

रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो

फळे खाणे आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. त्यामुळे सहसा आपण सफरचंद, संत्री, मोसंबी, चिकू या फळांचे सेवन करतो. पण, बाजारात मिळणारी इतर फळेसुद्धा आवर्जून खायला हवीत. त्यातील एक म्हणजे रामफळ. रामफळ, ज्याला नेटेड कस्टर्ड ॲपल किंवा वाइल्ड मिठाई म्हणूनदेखील ओळखले जाते. हे उष्णकटिबंधीय, हृदयाच्या आकाराचे फळ आहे ज्याची त्वचा हिरवी-पिवळी तर चवीला थोडे तिखट आणि गोड असते. फळाचा आतला भाग पांढरा आणि मलाईदार आहे, तर तुम्ही रोज रामफळाचे सेवन केले तर काय होईल? तुम्ही रोजच्या आहारात त्याचा समावेश केला तर तुम्हाला कोणते फायदे मिळतील.

रामफळाचे दररोज सेवन केले जाऊ शकते. कारण या फळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ सारखी पोषक तत्वे आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरसारखी खनिजे असतात. रामफळातील व्हिटॅमिन सी कंटेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास योगदान, तर आहारातील फायबर नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देऊन नियमित पचन होण्यास मदत करतात. रामफळात असणारे अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करू शकते, तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

रामफळ खाणे मधुमेहींसाठी योग्य ठरेल का

आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी सांगितले की, या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारणतः कमी ते मध्यम प्रमाणात म्हणजे ५४ टक्के आहे, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्ती सामान्यतः हे फळ खाऊ शकतात, पण अगदी कमी प्रमाणात. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही. पण, रामफळाचे जास्त सेवन केल्यावर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

रामफळ अनेक आरोग्य फायदे देत असले तरीही संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण रामफळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पाचन समस्या किंवा पोषक तत्वांचे असंतुलन होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

6 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

6 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

11 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

12 तास ago