महाराष्ट्र

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग २६ ते ३१ जुलै पर्यंत बंद! ‘हे’ आहे पर्यायी मार्ग

संभाजीनगर: शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गावर लोखंडी संरक्षक पाट्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे संपूर्ण मार्ग बंद राहणार आहे. नागरिकांनी प्रवासाच्या आधी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

दररोज २ लाख नागरिकांना फटका

या मार्गाचा दररोज सुमारे १.५ ते २ लाख नागरिक वापर करतात. मार्ग बंद असल्याने आता प्रवाशांना ५ किमीचा अधिकचा फेरा मारावा लागणार आहे. यामुळे वेळेचा अपव्यय आणि इंधन खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वाहतूक बदल, पर्यायी सुचना

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग बंद असल्यामुळे, नागरिकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे

पर्यायी मार्ग 2

देवलाई चौक → गोदावरी टी पॉईंट → संगम नगर→ उड्डाणपूल मार्ग हे मार्ग वाहनधारकांसाठी जलद आणि सोयीस्कर आहेत.

पर्यायी मार्ग २

देवलाई चौक→ गोदावरी टी पॉईंट एमआयटी कॉलेज→ आश्रम चौक→ रेल्वे स्टेशन

विशेषतः स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाचा उपयोग करावा.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कामाच्या वेळेत वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नेमणूक केली जाणार आहे. नागरिकांनी संयम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago