आरोग्य

शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायच

प्रोटीन्सची कमतरता बहुतांश लोकांच्या शरीरात दिसून येते. त्यात शाकाहारी लोकांच्या शरीरात तर प्रोटीन्सची नेहमीच कमतरता असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे त्राससुद्धा होत असतात. शरीराला प्रोटीन्सची गरज आहे, हे आपलं शरीर वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना देऊन सांगत असतं. पण असं असूनही आपलं त्याकडे लक्ष नसतं. कारण हा सगळा त्रास प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे होत आहे, हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे मग त्यावर योग्य तो उपाय केला जात नाही आणि तब्येतीच्या तक्रारी मग वाढतच जातात, असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आपल्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे सांगणारी काही लक्षणं वेळीच ओळखा.

शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायच

१) UCLA Health यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार प्राेटीन्सच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये नेहमीच वेदना होतात, थकल्यासारखे वाटते.

२) प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे केस खूप गळून पातळ होतात. नखं लगेच तुटतात, त्वचा खूप जास्त कोरडी होते.

३) प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे ओटीपोट, पाय, तळपास, हात याठिकाणी सूज येते. पण अनेकजणांना ते प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे होत आहे, हे लक्षातच येत नाही. त्यांना तो लठ्ठपणा वाटतो आणि ते त्याकडे दुर्लक्ष करतात.

४) शरीरात प्रोटीन्स कमी प्रमाणात असतील तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे वारंवार आजारी पडणे, कोणताही संसर्ग खूप पटकन होणे, असा त्रास होऊ लागतो.

५) शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरून येत नसतील तर प्राेटीन्सची कमतरता असण्याचं ते एक प्रमुख लक्षण असतं.

६) वारंवार मूड बदलणे, खूप चीडचीड होणे, एकाग्रता कमी होणे, पटकन निर्णय न घेता येणे ही सुद्धा प्रोटीन्सच्या कमतरतेची लक्षणं आहेत.

७) शरीरात प्रोटीन्स कमी असतील तर भूक वाढल्यासारखी होते किंवा मग सतत काही ना काही खावं वाटतं.. त्यातही जास्त कॅलरी असणारे, कार्बोहायड्रेट्स जास्त असणारे, खूप गोड असणारे पदार्थ खाण्याची इच्छा होते.

८) प्रोटीन्सची कमतरता असणाऱ्या लोकांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

12 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

18 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

21 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

21 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

21 तास ago