आरोग्य

हिवाळ्यात बाजरी खाण्याचे महत्त्व काय?

पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी असे प्रकार आपण वर्षभर खातच असतो. पण हिवाळ्याची चाहुल लागताच आजही अनेक घरांमध्ये बाजरी आणली जाते. आणि मग पाेळी, ज्वारीची भाकरी याऐवजी आठवड्यातून कधी कधी बाजरीची भाकरीही दिसते.

बाजरीचा भात किंवा खिचडी हा देखील हिवाळ्यातला एक पारंपरिक पदार्थ. भात किंवा भाकरी या माध्यमातून या दिवसांत बाजरी पोटात जाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे.

हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे

१) बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार तर ठेवतेच पण त्यासोबतच भरपूर उर्जाही देते. तूप, गूळ, दूध या पदार्थांसोबत ही भाकरी खावी. तसेच भाकरी गरम असताना खाणे अधिक चांगले.

२) बाजरी हे लाे कॅलरी डाएट मानले जाते. त्यामुळे वेटलॉस करत असाल, तरीही बाजरीची भाकरी तुम्हाला चालू शकते.

३) हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते. कारण बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते.

४) बाजरी नियमित खाल्ल्याने शरीरातील बॅड काेलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो.

५) बाजरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी या दिवसांत बाजरी नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

६) याशिवाय बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस ही खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

13 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

14 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

14 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

14 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago