आरोग्य

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु कोण…

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते.

झोपण्याची योग्य पद्धत…

चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा. झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे उत्तरेकडे डोके करून झोपल्यास जिवनशक्तीचा ह्रास होतो. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे.

निद्रानाशाचे परिणाम…

निद्रानाशामुळे शरीरात वेदना होणे, डोके जड पडणे, शरीर जड पडणे, अपचन होणे तसेच वातजन्य रोग जडतात. त्यामुळे योग्य निद्रा घेणे आवश्यक आहे. अपुरी झोप (गरजेपेक्षा कमी किंवा अयोग्य ) ही दुःख, अशक्तपणा, सुस्ती, अल्पायुष्य अशा व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आता आपण निद्रे बद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

आयुर्वेदानुसार एक सामान्य, निरोगी व्यक्तीस सहा तासांची झोप पुरेशी आहे. म्हणूनच पित्त आणि कफ कारक प्रकृतीच्या लोकांनी सहा तासांच्या झोपेची सवय करून घेतल्यास ते निरोगी राहतील.

शांत आणि योग्य प्रमाणात झोप घेण्याचे फायदे… 

चांगली झोप घेतली तर आपल्या शरीरातील हार्मोन्स ची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते, त्यामुळे आपला उत्साह व स्फूर्ती वाढते.

व्यवस्थित झोप घेतली तर लठ्ठपणासारखा मोठा आजार आपल्या जवळ ही येणार नाही.

सर्वेक्षणामध्ये असे समोर आले आहे की जे लोक कमी झोप घेतात त्यांची आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

चेहऱ्यावरील डाग कमी होतात…

लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ लागतात. आणि काळे डाग हळूहळू कमी व्हायला लागतात.

भूकेत सुधारणा होते…

पुरेशी झोप झाल्यास चांगली भूक लागते. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात.

कार्यक्षमतेत वाढ होते…

८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक तत्परतेने काम करू शकता. व आपली कार्यक्षमता वाढते. अशा प्रकारे योग्य, व्यवस्थित व वेळेवर झोप घेतल्यास आपले आरोग्य निरोगी राहते. म्हणूनच तर जेवण, व्यायाम, योगासने या बरोबरच झोपेलाही आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago