आरोग्य

केसांना शॅम्पू करताना कोणती काळजी घ्यावी

वेगवेगळे शॅम्पू वापरूनही जर चांगला परिणाम मिळत नसेल तर याचे कारण केस धुतांना करत असलेल्या चुका असू शकतात. जाणून घेऊया केसांना शॅम्पू करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात.

दोनदा शॅम्पू टाळा: एकाच वेळी सलग दुसऱ्यांदा पुन्हा शॅम्पू लावणे चुकीचे आहे. कारण याने केस अधिक ड्राय होतात. मात्र शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावले असेल किंवा केस ऑईली असतील, तेव्हाच दुसऱ्यांदा शॅम्पू लावावा, अन्यथा दुसऱ्यांदा शॅम्पू लावू नये.

थेट शॅम्पूचा वापर टाळा: बॉटल मधील शॅम्पू हातावर घेऊन थेट केसांना लावू नका. शॅम्पू मध्ये थोडं पाणी मिसळा. मग ते केसांना लावावं. कारण शॅम्पूचे टेक्स्चर थीक असते, अशातच ते थेट लावल्याने कुठे जास्त तर कुठे कमी लावले जाते आणि पूर्ण केसांमध्ये सारख्या प्रमाणात शॅम्पू लागत नाही.

केसांना समोरून शॅम्पू करणे टाळा: अनेक जण केसांना समोर घेऊन मग शॅम्पू करतात, जे चुकीचे आहे. केसांना नेहमी मागच्या बाजूने सरळच धुवायला हवे.

फक्त थंड पाणी टाळा: जर तुम्ही थंड पाण्याने केस धुत असाल, तर याने केस तुटण्याची भिती अधिक असते. म्हणून केस नेहमी पहिले कोमट पाण्याने ओले करा. यामुळे केसांची मूळं, पोर्स आणि हेअर क्यूटिक्लस ओपन होतात आणि शॅम्पूने चांगल्या पद्धतीनं केस स्वच्छ केले जावू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

5 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

6 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

7 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

24 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago