आरोग्य

थंडीत वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर काय कराव

सध्या थंडीचे दिवस आहेत. या काळात मुलांसह अनेकांची भूक वाढते. त्यामुळे नियमित आहाराबरोबरच अन्य खाद्यपदार्थ अतिरिक्त खाल्ले जातात. वातावरण चांगले असल्यामुळे विविध पदार्थांवर ताव मारला जातो. खाताना कुठल्या पदार्थात किती फॅट्स आणि कॅलरीज आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची भीती असते आणि भविष्यात व्याधींना सामोरे जावे लागू शकते.

हिवाळ्यात तापमान घसरल्यामुळे शरीराचे तापमानही कमी होते. शरीराचे तापमान वाढविण्यासाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी अन्नाचे सेवन हा एकमेव मार्ग असतो. शरीराची गरज म्हणून भूक वाढते. ती शमविण्यासाठी अतिरिक्त अन्नाचे सेवन केले जाते. परिणामी वजन वाढते. त्यामुळे या काळात कोणता आहार आपण घेत आहोत आणि आपण शरीराची किती हालचाल करत आहोत.

हिवाळ्यात गोड खाण्याची इच्छा होते

हिवाळ्यात अनेकवेळा कर्बोदके खाण्याची इच्छा होते. गोड खाणे वजनवाढीसाठी कारणीभूत असतात. काही वेळा गोड पदार्थ खूप खाल्ले जातात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्या प्रमाणात वाढते तशी ती कमीही होते. मात्र इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले असते, त्यामुळे अनेकवेळा भूक लागते.

काय करावे

खाण्याच्या वेळा ठरवून घ्या.

अन्नात प्रोटीनचा वापर करा

नियमित व्यायाम करा.

पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे.

हिवाळ्यातच असे का घडते

हिवाळ्यात शरीराची ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र ती मिळविण्यासाठी अनेकवेळा खाण्याची इच्छा होते. काही कुटुंबांत थंडीचे आगमन झाल्यावर विविध पदार्थ बनविण्याची परंपरा आहे. थंडीत डिंकाचे, मेथीचे लाडू खाणे आरोग्यदायी असते, असे समजले जाते. तीळपोळी, गुळपोळीचे सेवन सुद्धा या काळात अधिक प्रमाणात होते.

हिवाळ्यात भूक अधिक लागते, त्यामागे शास्त्रीय आणि सामाजिक अशी दोन्ही कारणे आहेत. ऊर्जानिर्मितीसाठी अधिक खाल्ले जाते. तसेच हिवाळ्यात सण येतात, लग्नसराई असते. त्यामुळे गोड पदार्थ अधिक खाल्ले जातात. वजनवाढीस ते कारणीभूत ठरतात. त्याचे दुष्परिणाम नंतर दिसतात. त्यामुळे हिवाळ्यात अशा पदार्थांची चव घ्यावी, मात्र ते अधिक प्रमाणात खाऊ नयेत. आपला नियमित पौष्टिक आहार घ्यावा. विशेष म्हणजे या काळात व्यायाम करावा. आहारावर नियंत्रण हाच खरा मंत्र आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

21 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago