आरोग्य

आपण आजारी पडु नये यासाठी काय करावे

हे करा 

आंघोळी पूर्वी मालिश करणे. कोणत्या प्रकृती साठी आणि कोणत्या ऋतू मध्ये कोणता तेल वापरायचा, मालिश कशी आणि कधी करायची असा सर्व अभ्यास योग्य माहिती असायला हवी.

दात घासण्यासाठी कोलगेट, पेप्सोडेन्ट ऐवजी आयुर्वेदिक दंतमंजन वापरायला हवं.उदा. दंतकांती, विको..तसेंच कधी कधी लिंबाच्या झाडाच्या काडी ने दात साफ करावे.

कमीत कमी 5 जास्तीत जास्त 30 मिनिटे अशा प्रकारे खालील प्रत्येक गोष्ट करणे

प्राणायाम- भस्रिका प्राणायाम, कपाळभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम आणि ध्यान

पुरेशी झोप कमीत कमी 7 जास्तीत जास्त 8 तास.

आवडीच्या गोष्टी करून मनाला प्रसन्न ठेवणे, आनंदी राहणे, हसणे. उदाहरणं – वाचन, संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे, फिरणे.

योग्य प्रमाणात पाणी पिणे

जेवणानंतर दोन घोट पाणी पिणे व अर्धा एक तासानंतर तहान असेल इतक पाणी पिणे, कमीतकमी एक ग्लास. थोडा वेळ शतपावली करणे.

रोज कमीत कमी 1-2 वेगवेगळी फळे खाणे. ऋतू नुसार येणारी फळे खाणे. संत्री, निंबू पाणी यांचा रोजच्या आहारात वापर हवा. कोणत्या फळाची कोणती प्रकृती(तासीर) आहे, ते कधी खावे, कधी खाऊ नये याबाबतीत नियम माहित हवेत नाहीतर फायदा होत नाही.

जेवणा सोबतचं काकडी, गाजर, बिट यांचा कच्च सेवन चांगलं असत.

ड्राय फ्रुटस च योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने सेवन. यांत कमीतकमी हनी आवळा, काळी मनुका, बदाम या तीन गोष्टी हव्यात.

दिवसांतुन एक दिवस उपवास.शक्य असल्यास फक्त पाणी पिणे.शक्य नसल्यास फक्त फळ आणि लिंबू पाणी पिणे

आपली प्रकृती कोणती आहे- वात, पित्त कि कफ हे जाणून त्यानुसार योग्य पूरक आहार घेणे आणि ऋतुंनुसार आहार घेणे विरुद्ध आहार नको. उदाहरणं थंडी, पाऊस असेल तर थंड पदार्थ त्रास करतील, पित्त प्रकृती असेल तर पित्त वर्धक आहार त्रास करेल.

हे टाळा 

1) साखर (पर्याय – खडीसाखर, गूल)

2) चहा

3) मीठ (पर्याय -सेंधव मीठ)

4) दूध व दुधाचे पदार्थ, बेकरी पदार्थ

5) सर्व प्रकारचे पॅकिंग फूड उदा. चिप्स वगैरे

6)सर्व प्रकारचे प्रोसेस फूड उदा. बिस्कीट वगैरे

7) रिफाईंड तेल

8) फास्ट फूड

9) चायनीज फूड

10) ऍनिमल फूड

11) सर्व प्रकारचे पेय, कोल्डड्रींक्स वगैरे

कोणतीही गोष्ट अती प्रमाणात करू नका :- 

प्रत्येक गोष्ट मग ती कितीही चांगली किंवा आवश्यक असली तरीही तिचा अतिरेक झाला की ती घातक ठरते. पाणी पिणे आवश्यक पण हेच पाणी अती प्रमाणात घेतले की त्याचा ही शरीरात त्रास होतो. व्यायाम ही आवश्यक पण तो ही अती केला की घातक होतो.सुट्टी न घेता केलेल काम, अती जागरण, अती झोप अशी प्रत्येक गोष्ट जी चांगली असो, आवश्यक असो अथवा वाईट असो एकदा का अतिरेक झाला की ती विषाचं काम करते, घातक ठरते. म्हणून सरळ साधा नियम अतिरेक नको.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

13 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

13 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

13 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

22 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

22 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

22 तास ago