शिरूर तालुक्यातील तलाठयांकडून अजूनही अनेक नोंदी प्रलंबित…
वरीष्ठ आधिकाऱ्यांच्या कारवाई कडे नागरीकांचे लक्ष
शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील अनेक तलाठ्यांकडे १५५ दुरुस्ती, जमिन बिगरशेती केल्याच्या नोंदी, खरेदीखताच्या, बॅकेचा बोजा चढवण्याच्या नोंदी गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित असल्याने अश्या तलाठ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
कोरेगाव भीमा येथील तलाठी तहसिलदारांनी दिलेल्या जमिन बिगरशेती आदेशाची तीन महीने उलटून गेले तरी नोंद करत नाहीत. पैसे दिल्याशिवाय कोणत्याच नोंदी करत नाहीत, असा आरोप लक्ष्मण गव्हाणे यांनी केला आहे. वारंवार फोन करूनही कुठल्याच नोंदी केल्या जात नाही. तीच बोंब सणसवाडी येथील तलाठ्याची आहे. या हायवेच्या कडेला असणाऱ्या मग्रुर तलाठयांची तातडीने चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे. तेथील मंडल अधिकारी काय करतात? त्यांच्यावर ते नियंत्रण ठेवू शकत नाही का? उशिरा टाकणाऱ्या नोंदीचे व पाठीमागून लगेच केल्या जाणाऱ्या नोंदी पाठीमागचे नक्की गौडबंगाल काय आहे. हे समजायला शिरूर तालुक्याची जनता खुळी नाही. ‘सरकारी काम अन् बारा महीने थांब’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय नागरीकांना येत आहे. नागरीकांचा आता संयम सुटत चालला असून सामाजिक कार्यकर्ते आता याबाबत मैदानात उतरून दोषी तलाठी, मंडल आधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन करणार आहेत.
‘तलाठी, मंडल आधिकारी जोमात नागरीक कोमात अशी’ अवस्था शिरुर तालुक्याची झाली आहे. शिरूर तालुक्यात नवीन आलेले बरेच मंडल आधिकारी, तलाठी वरिष्ठांचा प्रोटोकॉल पाळून आवडीच्या सजाच्या ठिकाणी आले आहेत. बऱ्याच सजाच्या ठिकाणी झिरो पंटर काम चालवत आहे. संगणमताने ते नोंदी साठी नागरिकांची अडवणुक करून त्यांना लुटत आहेत.
(क्रमशः)
शिरूर तालुक्यातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांकडून आर्थिक मलईसाठी नोंदी करण्यासाठी होतेय टाळाटाळ…
Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त…
शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले
जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…