आरोग्य

लग्न ठरवताना दोघांचा ब्लड ग्रुप एकच असेल तर लग्न करावे की नाही

आजकाल लग्न करताना एकमेकांची आरोग्यासंबंधी माहिती मिळवणं किंवा ब्लड टेस्ट रिपोर्टची मागणी करणं महत्वाचं मानलं जातं. जेणेकरून लग्नानंतर काही समस्या होऊ नये. यासोबतच आजकाल दोघांचा ब्लड ग्रुप एकसारखा असल्यावर लग्न करावं की नाही? असाही प्रश्न अनेकांना पडत असतो. कारण बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, एकसारखा ब्लड ग्रुप असलेल्या जोडप्यानं लग्न केल्यास त्यांच्या होणाऱ्या बाळाला आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल किंवा कुणी सांगितलं असेल तर आधी योग्य माहिती मिळवा.

मुळात ब्लड ग्रुप दोन प्रकारात विभागलेले असतात. एक म्हणजे A, B, AB आणि O. तर दुसरा भाग म्हणजे RH फॅक्टर्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं? तर ज्या लोकांमध्ये आरएच एंटीजन असतात ते लोक आरएच पॉझिटिव्ह असतात. ज्या लोकांमध्ये आरएच एंटीजन नसतात ते लोक निगेटिव्ह असतात. म्हणून प्रत्येक ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो.

जर होणारी आई आरएच निगेटिव्ह असेल आणि होणारे वडील आरएच पॉझिटिव्ह असतील तर होणारं बाळ हे RH पॉझिटिव्ह जन्माला येतं. अशावेळी आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे या स्थितीत गरोदर असलेल्या महिलेला म्हणजे RH निगेटिव्ह महिलेला एनटीडीचं इन्जेक्शन दिलं जातं. असं केल्यास जोडप्याच्या होणारं बाळ हे जन्माला सुरक्षितच येतं. त्यामुळे लग्न करणाऱ्या जोडप्याचा ब्लड ग्रुप सारखा नसावा हे सांगण्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. ब्लड ग्रप सारखा आहे म्हणून त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं नाही, यात काहीच तथ्य नाही.

याबाबत डॉक्टरांनी एक सल्ला दिला की, जोडप्यांनी hb electrophoresis चाचणी करून घ्यायला हवी. जेणेकरून बाळाला hemoglobin abnormalities होऊ शकतो की नाही याबाबत कळू शकेल. सोबतच यावरून लक्षात येतं की बाळाला थालेलिमिया होण्याची शक्यता आहे की नाही.

लग्नानंतर बाळांना आरोग्यासंबंधी काही समस्या होऊ नये यासाठी डॉक्टर सल्ला देतात की, शक्य असल्यास जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न करू नका. जर करायचंच असेल तर दोघांच्याही जेनेटिक्सचा अभ्यास केला जावा. जेणेकरून सतत गर्भपात होणं, बाळामध्ये दोष होण्याची शक्यता कमी असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

8 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

8 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

8 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

8 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

8 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

22 तास ago