आरोग्य

लिंबू पाणी कधी पिऊ नये? लिव्हरच्या आजारांचाही त्रास, पाहा – लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ

लिंबात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. लिंबाच्या सेवनानं वजन कमी करण्यासही मदत होते. तसंच लिंबाच्या सेवनानं त्वचा आणि केस चांगले राहतात. बरेच लोक सकाळी लिंबू पाण्याचं सेवन करतात. सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय नेहमी योग्य नसते. या सवयीमुळे तुमचं लिव्हरही खराब होऊ शकतं. डॉक्टर सलिम जैदी सांगतीत की रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं ही हेल्दी सवय आहे. पण प्रत्येकासाठीच हे योग्य नाही.

कोणत्या समस्या असल्यास लिंबू पाणी पिऊ नये

जर कोणालाही ॲसिडिटी, लिव्हर कमकुवत होणं, दातांमध्ये झिनझिण्या अशा समस्या असतील तर रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊ नये. कारण अत्याधिक सिट्रिक ॲसिड तब्येतीचं नुकसानकरू शकते. यामुळे दातांचे इनॅमल हळूहळ डॅमेज होते. जे लोक रोज लिंबू पाणी पितात त्यांच्या आरोग्याला धोका असतो.

रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊ नये. ज्यांना किडनीची समस्या आहे त्या लोकांनी लिंबू पाणी पिणं टाळायला हवं. यामुळे किडनीवर दबाव पडतो. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. क्रोनिक किडनी डिसिज असल्यास लिंबू पाणी पिणं टाळायला हवं.

लिव्हर खराब होऊ शकते

लिंबाचे ॲसिड लिव्हर फंक्शन वाढवते जे सामान्य व्यक्तीसाठी योग्य नाही. पण जर लिव्हर कमकुवत किंवा आजारी असेल तर दबाव वाढ लागतो. जर डायजेशन आणि लिव्हर डिटॉक्स सिस्टम दोन्ही कमकुवत असेल तर लिव्हर डॅमेज होऊ शकते.

मनुक्यांचे पाणी कधी प्यावे

जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा सेंसिटिव्ह दातांची समस्या असेल तर तुम्ही लिंबू पाण्याऐवजी दुसरा उपाय करू शकता. रात्रभर मनुके पाण्यात भिजवून याचे पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी हे प्यायल्यानं लिव्हर डिटॉक्स होते आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवत नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

7 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

7 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

7 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

13 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

14 तास ago