महाराष्ट्र

…तर भारताचं मोठं नुकसान झालं असत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती दिली. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर नेमकं काय घडलं? भारताने ऑपरेशन सिंदूर कसं पार पाडलं गेलं याबाबत सांगितलं. तसेच नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानच्या एका मोठ्या हल्ल्याबाबत सांगितले आहे. पाकिस्तानने तब्बल 1000 मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला होता, असे मोदींनी सांगितले.

भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला

पाकिस्तानच्या या मिसाईल्स आणि ड्रोन भारताच्या कोणत्याही भागात पडले असते तर मोठा विध्वंस झाला असता असेही मोदी यांनी सांगितले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या मिसाईल आणि ड्रोन्सना नेस्तनाबूत केले. मी आज एक आकडा सांगणार आहे. हा आकडा ऐकून संपूर्ण देशाचा उर गर्वाने भरून येईल. 9 मे रोजी पाकिस्तानने जवळजवळ 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मोदींनी संसदेत दिली.

भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले

तसेच, या मिसाईल्स भारताच्या कोणत्याही भगावर पडल्या असत्या तर तिथे मोठा विध्वंस झाला असता. पण या 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने आकाशातच हाणून पाडले, असंही मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

तेव्हा पाकिस्तानला अक्कल आली

पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवर हल्ला झाल्याची खोटी माहिती पसवरली गेली. मी दुसऱ्या दिवशीच आदमपूरला गेलो आणि पाकिस्तानचं खोटं उघडं पाडलं. तेव्हा पाकिस्तानला अक्कल आली. राजकारणात काही नवे पक्ष आहेत, त्यांना सत्तेचा अनुभव नाही. त्यांच्याकडून काही गोष्टी घडल्या तर समजू शकतो. पण काँग्रेसने सत्ता भोगली आहे. त्यांना शासनव्यवस्था माहीत आहे. त्यांना अनुभव आहे. तरीही परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिलं तरी त्याला स्वीकारत नाही, गृहमंत्री बोलले, संरक्षण मंत्री बोलले त्यांच्यावर विश्वास नाही, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

10 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

10 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

10 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

10 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

11 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

1 दिवस ago