शिरूर तालुका

ST प्रवासात अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर-चौफुला एस. टी प्रवासात बसमधील सीटच्या खालील बॅग मधील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ३ लाख ४५ हजार ५०० रु. चा ऐवज अज्ञात चोरट्यांने चोरुन नेला आहे.

याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा आत्माराम लोंढे (वय ६०) रा. वाडाकॉलनी, शिरुर, यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. (दि. २६) फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते पावणेचार च्या दरम्यान केडगाव चौफुला ते शिरुर प्रितमप्रकाश नगर, दरम्यान शिरुर-चौफुला एस टी बस नं एम .एच. ४० वाय- ५८१४ मधील कंडक्टर शेजारी बसलेल्या शिटखाली ठेवलेल्या बॅगमधुन अज्ञात चोरट्याने दागिने चोरी करुन चोरून नेले आहे. त्यात सोन्याचे कानातील झुमके, नाकातील दोन नथ, हातातील अंगठ्या, गळ्यातील हाफ गंठण, चांदीचे पैजन, छल्ला, मासोळ्या व जोडवे तसेच दहा हजार रु. रोख रक्कम असा ३, ४५,५०० रु चा ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राउत हे करीत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

12 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago