आरोग्य

कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे घाबरल्यासारखं वाटत…

आजकाल कामाच्या वाढलेल्या ताणामुळे बरेच लोक तणावात असतात. नंतर याची लक्षणं वाढतात. कामाचा ताण, कुटुंबाची वाढती जबाबदारी, लाइफस्टाईलच्या चुकीच्या सवयी यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतो. पण अनेकदा काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही सुद्धा ही समस्या होते. तणाव वाढला की, व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटतं. तणावामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. अशात आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काही व्हिटॅमन्सचा समावेश करणं गरजेचं असतं.

व्हिटॅमिन बी 1

व्हिटॅमिन बी 1 म्हणजे थियामनच्या कमतरतेमुळे व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटू शकतं. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी 1 कमी होतं तेव्हा डिप्रेशन, चिंता, चिडचिडपणा आणि झोप न येणं अशा समस्या होतात. व्हिटॅमिन बी1 मुळे मेंदुत ग्लूकोजला ऊर्जेल बदलण्याचं काम होतं. जर हे व्हिटॅमिन शरीरात पुरेसं नसेल तर थकवा, भूक न लागणं आणि पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला नेहमीच घाबरल्यासारखं वाटत असेल तर व्हिटॅमिन बी1 असलेल्या फूड्सचा आहारात समावेश करावा.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी शरीरासाठी फार महत्वाचं असतं. यानं हाडं आणि मासंपेशी मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डी कमी झालं की, मानसिक आरोग्याची समस्या होत. घाबरलेपणाही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे वाटू शकतो. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तणाव, घाबरलेपणा किंवा चिंता वाटत असेल तर डाएटमध्ये व्हिटॅमिन डी देणाऱ्या फूड्स समावेश करावा.

व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन बी महत्वाच्या तत्वांपैकी एक आहे. जेव्हा शरीरात याची कमतरता होते, तेव्हा थकवा, चिंता, चिडचिडपणा जाणवतो. व्हिटॅमिन बी मुळे मूड आणि ऊर्जेत वाढ होते. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12 आणि बी9 गरजेचे असतात. त्याशिवाय आयर्न, आयोडीन, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड कमी झाल्यावरही घाबरल्यासारखं वाटू शकतं.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

31 मिनिटे ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

5 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

8 तास ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

19 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

20 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

23 तास ago