आरोग्य

लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात.

पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. या हार्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी आवश्यक असणारी पूबीजे (शुक्राणू) व स्त्रीबीजे (अंडी) अनुक्रमे तयार होतात.

दुय्यम लैंगिक लक्षणात आवाज फाटणे, कंठ फूटणे, काखेत व जननेंद्रियांवर केस येणे ह्यांचा समावेश मुले मुली या दोहोत होतो. मुलींमध्ये स्तनांची वाढ होते. मेदाचे साठे वाढतात. मासिक पाळी सुरू होते. मुलांमध्ये दाढी मिशा येऊ लागतात. बिजाची निर्मिती होऊ लागते.

मुली मुलांमध्ये वेगवेगळे हार्मोन्स स्रवत असल्याने मुलींना दाढी मिशा येत नाहीत. तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होत नाही. एक लक्षात घ्यायला हवे की मुलींमध्ये टेस्टेस्टेरॉन असतो. पण तो अत्यंत अल्प प्रमाणात असतो व मुलांमध्येही अत्यल्प प्रमाणात इस्टोजेन असतो. काही वैगुण्यांमुळे वा विकारांमुळे या हार्मोन्सचे प्रमाण वाढल्यास मुलींमध्ये दाढी मिशासारखी पुरुषी लक्षणे तर मुलांमध्ये स्तनांची वाढ होण्यासारखी बायकी लक्षणे दिसून येतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

19 मिनिटे ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

27 मिनिटे ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

30 मिनिटे ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

33 मिनिटे ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

38 मिनिटे ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

44 मिनिटे ago