सामाईक सातबारा म्हणजे काय
एका सातबारा उताऱ्यावर अनेक व्यक्तींची नावे असलेली जमीन म्हणजे सामाईक सातबारा.
या जमिनीत कोणाचा किती हिस्सा आहे, हे स्वतंत्रपणे नमूद नसते.
जमीन सर्व मालकांची मिळून, सामायिक स्वरूपात असते.
वेगळा सातबारा का आवश्यक असतो
स्वतःच्या हिस्स्याची स्पष्ट नोंद
बँक / पीक कर्ज घेण्यासाठी
जमीन विक्री, खरेदी किंवा गहाण ठेवण्यासाठी
कायदेशीर हक्क सिद्ध करण्यासाठी
भविष्यातील वाद टाळण्यासाठी
सामाईक सातबारामधून वेगळा सातबारा कसा करावा?
१) हिस्सा वाटप (विभागणी)
प्रत्येक मालकाचा हिस्सा निश्चित करणे
जमिनीवरील नेमका भाग ठरवणे
प्रत्यक्ष जमिनीवर वाटणी दाखवणे
२) अर्ज कुठे करायचा?
जवळच्या तलाठी कार्यालयात विभागणीसाठी अर्ज
३) आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
मूळ सातबारा उतारा
जमिनीचा नकाशा (सीमा स्पष्ट असलेला)
प्रत्यक्ष मोजणीसाठी लेखी अर्ज
इतर मालकांची सहमती असल्यास प्रक्रिया जलद होते
४) प्रत्यक्ष मोजणी (मिनिट)
तलाठी व भूमापन अधिकारी जमिनीवर येतात
सर्वांच्या उपस्थितीत मोजणी होते
मोजणी अहवाल (मिनिट) तयार केला जातो
संबंधित सर्वांच्या सह्या घेतल्या जातात
५) तहसीलदार निर्णय
अहवाल तहसीलदारांकडे सादर
वाद असल्यास नोटीस व सुनावणी
सुनावणीनंतर आदेश दिला जातो
६) स्वतंत्र सातबारा तयार
स्वतंत्र उपविभाग गट क्रमांक
तुमच्या नावावर वेगळा सातबारा उतारा मिळतो
ही प्रक्रिया कुठे होते
तलाठी कार्यालय
मंडळ अधिकारी (Circle Officer)
तहसील कार्यालय
भूमी अभिलेख / भूमापन कार्यालय
संबंधित कायदे
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966
मिनिट बुक, पंचनामा तलाठी तयार करतो
शेजारील जमिनीच्या मालकांची नोंद घेतली जाते
संभाव्य अडथळे
सर्व मालकांची सहमती नसणे
न्यायालयीन वाद प्रलंबित असणे
कोर्ट निकाल येईपर्यंत प्रक्रिया स्थगित
अतिक्रमण / मोजणी अडचणी
अधिक माहितीसाठी
जवळच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा
तहसील कार्यालयात माहिती घ्या
भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क करा
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…