आरोग्य

हिवाळ्यात दुप्पट वेगाने का वाढतं कोलेस्टेरॉल

हिवाळ्यामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही वाढतात. या काळात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. असं म्हटलं जातं की, चांगलं आयुष्य जगण्यासाठी हृदय निरोगी असणं गरजेचं आहे. आपलं हृदय निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पोषक आहार घेणं, व्यायाम करणं आणि चांगली झोप घेणं.

शरीराला जास्त ऊर्जा लागते

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात अधिक कॅलरीजचा समावेश करत राहतो. हिवाळ्यात तळलेले अन्न खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढते.

व्हिटॅमिन डीची कमतरता

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करायची असेल तर सूर्यप्रकाशापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. कोलेस्टेरॉलची लेव्हल नियंत्रित ठेवण्यास व्हिटॅमिन डी मदत करतं.

व्यायामाचा अभाव

हिवाळ्यात, बहुतेक लोकांना अंथरुणातून उठायला कंटाळा येतो. अशा परिस्थितीत व्यायाम किंवा चालणं शक्य होत नाही. यामुळे शरीरात चरबी जमा होण्यास सुरुवात होते, त्यामुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल वाढते.

हाय कोलेस्टेरॉल कसं कंट्रोल कराव

हिवाळ्यात तुम्ही एक्टिव्ह राहा. तुम्ही व्यायाम किंवा वर्कआऊट करा.

योगासने आणि प्राणायाम देखील करू शकता. धावणं शरीरासाठी उत्तम ठरू शकतं.

हिवाळ्यात जंक फूड कमी खा. मीठ देखील कमी वापरा. कारण ते घातक ठरू शकतं.

हिवाळ्यात व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्या.

तुमच्या आहारात फायबरचा समावेश नक्की करा.

फायबरमुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल कमी होते.

अति तणावामुळेही कोलेस्टेरॉल वाढू शकतं. तुम्ही तणाव किंवा टेन्शन घेणे टाळावं.

ध्यान, प्राणायाम किंवा दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायामाने तुम्ही तणावमुक्त राहू शकता.

हिवाळ्यात पाणी पिणं बंद करू नका. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकाल.

चांगली झोप ही निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. आठ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत…

54 मिनिटे ago

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

5 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

19 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

19 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

19 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

20 तास ago