मुख्य बातम्या

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ येणार असल्याची गोपनीय माहिती वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली होती. पुणे- नगर हायवेवर शिक्रापुर येथे वाहतूक शाखेचे कर्तव्य तत्परतेने काम करणारे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी ही बाब तात्काळ वरिष्ठांना सांगून सापळा रचून ५३ किलो गांजासह दोन स्कार्पिओ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 

शिक्रापुर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी तब्बल ५३ किलो गांजा सह एक स्कॉर्पिओ गाडी वैष्णव वैजनाथ ढाकणे, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, हर्षद देविदास खेडकर, शुभम बंडू जवरे, तुषार रामनाथ जवरे व अक्षय कांतीलाल आव्हाड या सहा जणांना अटक केली आहे.

 

शिक्रापुर (ता.शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे-नगर महामार्गावरुन दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधुन काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुर-पुणे नगर रस्त्यावर सापळा लावला असता त्यांना दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये १९ लाख ६० हजार ७४० रुपयांचा ५३ किलो गांजा असल्याचे दिसून आले.

 

दरम्यान पोलिसांच्या पथकाने दोन्ही स्कॉर्पिओ सह त्यामध्ये असलेला तब्बल ५३ किलो गांजा जप्त करत गांजा वाहतूक करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. वैष्णव वैजनाथ ढाकणे (वय २३ वर्षे रा. हासनपूर ता. शेवगाव जि. अहिल्यानगर, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर (वय २२) व हर्षद देविदास खेडकर (वय २०) दोघे रा. एकनाथवाडी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर, शुभम बंडू जवरे (वय २१) व तुषार रामनाथ जवरे वय (वय २१) दोघे रा. वाडगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर, अक्षय कांतीलाल आव्हाड (वय २६) रा. करमाळा रोड राशीन ता. कर्जत जि. अहिल्यानगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. या कामगिरीमुळे पोलीस हवालदार मिलिंद देवरे तसेच शिक्रापुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर तालुक्यातील ‘या’ गावात भुजल पातळी खाली गेल्याने बोअरवेल घेण्यास बंदी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

10 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

11 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

11 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

11 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

16 तास ago