आरोग्य

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या…

हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत जाते, तेव्हा आपल्या शरीराला थंडीशी लढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसेच उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटक हवे असतात. गरम सूप आणि चहा हे हिवाळ्यात सेवन करता येईल, असे महत्त्वाचे पदार्थ आहेत. तसेच, पालेभाज्यासुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत.

आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्या

पालक: पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी व फोलेट भरपूर प्रमाणामध्ये असते. पालक ॲनिमियाचा सामना करण्यासाठीही मदत करते; तसेच रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते. पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्याशिवाय त्यामधील मॅग्नेशियम ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळते. पालक हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे; जो पचनक्रिया सुधारतो. सूप, करी किंवा सॅलडमध्ये पालकचा वापर केला जातो. मसाले आणि इतर घटकांचा समावेश पालकाची चव आणखी वाढते.

केल: केल ही एक पालेभाजी असून, ती आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी व के भरपूर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि ते आजारांपासून दूर ठेवते.

मोहरीच्या पानांची भाजी: आशियाई आणि भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोकप्रिय असलेली भाजी म्हणजे मोहरीच्या पानांची भाजी. या भाजीमध्ये सी, के व बीटा-कॅरोटीन ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात; जी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

मेथी: मेथीमध्ये लोह, फायबर व प्रोटीन्स यांचे प्रमाण भरपूर असते; ज्यामुळे थकवा दूर राहून, ऊर्जा टिकण्यासाठी साह्य मिळते. मेथीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासाठी पराठा, डाळ, भाज्यांमध्ये मेथीचा समावेश करावा.

काश्मिरी साग: ही भाजी सर्वांत जास्त काश्मीरमध्ये दिसून येते. त्यामध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि सहज विरघळणारे फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. ही भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. या भाजीमध्ये ग्लुकोसिनोलेट्सदेखील असतात, जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. हिवाळ्यात ही भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.

राजगिरा पाने: राजगिरा म्हणजे लाल पालक, ज्याला आपण लाल माठाची भाजी, असेसुद्धा म्हणतो. त्यामध्ये लोह, कॅल्शियम व पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते; जे स्नायू आणि हाडांचे आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर आहे. राजगिरा हा फायबरयुक्त असून, त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचासुद्धा समावेश आहे; जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्याशिवाय राजगिऱ्याची भाजी ऑक्सिडेटिव्ह तणावसुद्धा कमी करते. तुम्हाला आवडतात त्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. या भाज्या ओल्या कापडात किंवा किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी या भाज्या त्यावरील धूळ किंवा कीटकनाशके दूर करण्यासाठी नीट स्वच्छ करून घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

9 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

9 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

10 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

10 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

10 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

10 तास ago