महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील शिरूर-गेवराई तालुक्यांना जलसंपन्नतेची भेट…

सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतराला मंत्रिमंडळाची मान्यता; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला यश

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत असून हा निर्णय उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पालकमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांना बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या निर्णयामुळे शिरूर – कासार व गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बॅरेज झाल्यानंतर या भागातील पाणीसाठ्यात वाढ होऊन परिसरातील विहिरी, बोअरवेलांची पाणी पातळी तसेच भूजलस्तर उंचावणार, परिणामी खरीप-रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.शेतकरी व नागरिकांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून, बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले जात आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

12 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

13 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago