आरोग्य

विड्याचे पान खाण्याचे फायदे

जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते. पानात मधुमेह विरोधी, हृदय व रक्तवाहिन्या संबंधी, दाहक विरोधी, व्रण विरोधी आणि संसर्ग विरोधी गुणधर्म असतात. सुपारीच्या पानात १.३ मायक्रोग्रॅम आयोडीन, ४.६ मायक्रोग्रॅम पोटॅशियम, १.९ मोल्स किंवा २.९ एमसीजी व्हिटॅमिन-ए, १३ मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी-1 आणि ०.६३ ते ०.८९ मायक्रोग्राम निकोटीनिक ऍसिड प्रति १०० ग्रॅम असते. सुपारीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात, याबाबत माहिती जाणून घेऊया.

बद्धकोष्ठतेवर उपाय

अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. जे शरीरातील पीएच पातळी सामान्य करण्यात, व पोटॅशियम संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे पान उपयुक्त उपाय म्हणून मानला जातो. सुपारीचे पान बारीक पेस्ट करून, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी उठल्या नंतर हे पाणी गाळून प्या.

श्वासाची दुर्गंधी व दातांचा पिवळेपणा

सुपारीच्या पानात अनेक जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे होणे, प्लेक आणि दात किडणे यापासून आराम देतात. जेवणा नंतर सुपारीची पाने चघळल्याने फायदा होतो.

श्वसन प्रणालीसाठी

खोकला, ब्राँकायटिस, दमा यांसारख्या श्वसन विषयक आजारांवर सुपारीची पाने विशेषतः वापरली जातात. पानात आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.

मधुमेह नियंत्रित करते

सुपारीच्या पानात अँटी हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात, जे साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. सुपारीची पाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढण्या पासून रोखतात. टाईप २ मधुमेह असलेल्यांना सकाळी रिकाम्या पोटी पाने चावून खाल्ल्याने फायदा होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

9 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

10 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago