लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी: आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे असे बोलून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे.

शारीरिक संबंधातून मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत पवन उर्फ गुरु कैलास ओव्हाळ याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात IPC 376, 376 (2) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय ४२) हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ३) रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पवन उर्फ गुरु ओव्हाळ (वय १९) रा. थेरगाव, मुळ रा. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर सांगवी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट चा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो कारागृहात आहे.

आरोपीने फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी जवळीक साधली. ‘आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे’, असे बोलून त्याने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिला मुल होऊन त्याचा देखील मृत्यू झाला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. जे. गोडे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

4 तास ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

18 तास ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

19 तास ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

2 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

2 दिवस ago