महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी शिवसेनेला मोठा धक्का; नर्मदाताई वैतींसह शेकडो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

मिरा-भाईंदर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांनी शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सुर्वे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

नर्मदाताई वैती यांचा मिरा-भाईंदरच्या राजकारणात दीर्घ अनुभव आहे. २००७ ते २०१७ या कालावधीत त्यांनी भाईंदर पूर्वच्या नगरसेविका म्हणून काम केले आहे. तसेच मिरा-भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण उपसभापतीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

कुठलीही निवडणूक तोंडावर नसताना वैती आणि सुर्वे यांच्यासारख्या अनुभवी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या पक्षप्रवेशामुळे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, मिरा-भाईंदर हा शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. स्थानिक पातळीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यात अनेकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देत नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांच्या प्रभावक्षेत्रातच राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशाचा आगामी स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सरकार कुणाचेही असो, रामदास आठवले यांचे मंत्रीपद निश्चित? फडणवीसांनी आठवलेंच्या शैलीत सादर केली कविता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षफुटी, पक्षांतर आणि सत्तेच्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे…

1 मिनिट ago

मुंडे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते; सोनिया गांधींचीही परवानगी, पण मनमोहन सिंगांच्या भूमिकेमुळे प्रवेश रखडला

मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला…

11 मिनिटे ago

बीडमध्ये धक्कादायक प्रकार; विलास घुले यांच्या पत्नीने वृत्तवाहिनीसमोरच केले विषप्राशन

बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग…

14 मिनिटे ago

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला राहुल गांधी, खर्गेंची दांडी; बैठक व्यवस्थेवर नाराजी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले.…

19 मिनिटे ago

चाकणसाठी स्वतंत्र औद्योगिक नगरी; फडणवीसांची मोठी घोषणा

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या परिसरातील वाढते औद्योगिकीकरण तसेच पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात…

21 मिनिटे ago

सांगलीत ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रा; भगवा ध्वज विरुद्ध तिरंगा वाद पुन्हा पेटला

  सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रेचे…

24 मिनिटे ago