महाराष्ट्र

दहावी-बारावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा – शासनाचा निर्णय लवकरच

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सर्जनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे.

महत्त्वाचे बदल:

शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होणार

२०२६-२७ पासून शाळेचे शैक्षणिक वर्ष जूनऐवजी १ एप्रिलला सुरू होणार आहे.

अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल.

परीक्षेच्या पद्धतीतील बदल:

दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन होणार

1) मुख्य परीक्षा (Main Exam)

2) श्रेणी सुधारणा परीक्षा (Improement Exam)

परीक्षांमध्ये घोकंपट्टीऐवजी *रचनात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार.

अभ्यासक्रम आणि विषय निवडीतील स्वातंत्र्य:

CBSE च्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार.

विद्यार्थ्यांना आवडीनुसार विषय निवडण्याची मुभा राहणारा आहे.

गणित व विज्ञान यांचे स्वरूप अधिक प्रगत होणार.

अध्यापनातील बदल:

तासिकेची वेळ ४५ मिनिटांऐवजी ५० मिनिटे करण्यात येईल.

शाळांच्या वेळा दोन ✌🏻सत्रांमध्ये विभागल्या जातील.

‘दप्तरमुक्त शाळा’ उपक्रम:

६वी ते ८वीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी १० दिवस *दप्तरमुक्त शाळा* भरवण्यात येणार

कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप व सर्जनशीलतेसाठी प्रोत्साहन दिला जाईल.

टप्प्याटप्प्याने धोरणाची अंमलबजावणी:

२०२५-२६: इयत्ता दुसरीपर्यंत अभ्यासक्रम बदल करण्यात येईल.

२०३०: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णतः लागू होईल.

बदलांमागील उद्दिष्टे:

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण.

ताणमुक्त व आनंददायी शिक्षण पद्धतीचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न

भविष्यासाठी सर्जनशील आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा.

शासनाचा निर्णय लवकरच जाहीर होणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago