महाराष्ट्र

PMRDA च्या भोसरी येथील 1604 सनदिकांची पार पडली सोडत

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) कार्यक्षेत्रातील भोसरी येथील पेठ क्र.12 मधील 824 आणि पेठ क्र 30-32 मधील 780 सदनिकांसाठीची संगणकीय सोडत आज (दि 15) रोजी काढण्यात आली. संगणकीय सोडतीची प्रक्रिया महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. सदर सोडत ही लाभार्थी कोमल जनार्धन वंजारे, प्रदिप शिवाजी वेताळ, कोमल राजेंद कातुरे यांच्या हस्ते काढण्यात आली.

पेठ क्र.12 EWSआणि LIG विजेत्यांचा तपशील खालीलप्रमाणे

पेठ क्र.12 गट प्रवर्ग विजेत्यांची संख्या

EWS ST 29

DT 2

LIG GP 217

SC 21

ST 11

DT 5

NT 6

PH 0

पेठ क्र.12 मधील EWS व LIG या गटामधील 291 एवढे अर्जदार सोडतीमध्ये विजेते झाले आहेत.

पेठ क्र.30-32 गट प्रवर्ग विजेत्यांची संख्या

EWS GP 23

SC 9

ST 0

DT 1

NT 2

PH 2

LIG GP 114

SC 26

ST 2

DT 2

NT 6

PH 3

पेठ क्र 30-32 मधील EWS व LIG या गटामधील 190 एवढे अर्जदार सोडतीमध्ये विजेते झाले आहेत.

सर्व विजेत्यांची नावे पोर्टलवर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. पेठ क्र.12 च्या EWS साठी प्रतिक्षा यादी काढण्यात आली आहे. या सोडतीसाठी सनियंत्रण समितीचे सदस्य एम.एम.पोतदार, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश धनंजय कुलकर्णी सेवानिवृत्त जिल्हा सूचना अधिकारी पुणे उपस्थित होते. तसेच सहआयुक्त बन्सी गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार, उप जिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप, आणि म्हाडा विकसीत संगणक प्रणालीचे काम पाहणारे प्रोबिटी सॉफ्ट लि.चे कार्यकारी संचालक निलेश डोईफोडे व त्यांची टिम यावेळी उपस्थित होती.

या विजेत्या लाथार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी (दि. 26) डिसेंबर 2022 पासुन सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक सुचनापत्र (दि. 20) डिसेंबर 2022 पर्यंत वैयक्तिक ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना (दि. 10) जानेवारी 2023 पुर्वी अंतिम वाटपपत्र देण्यात येवून सदनिकेची उर्वरीत विहित रक्कम भरण्यासाठी (दि. 31) जानेवारी 2023 पर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. सर्व रक्कम अदा केल्यानंतर सदनिकांची नोंदणी करून ताबा देण्याचे नियोजन आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

8 तास ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

9 तास ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

1 दिवस ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

1 दिवस ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

3 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

3 दिवस ago