महाराष्ट्र

21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन

मुंबई: शरीर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या इंडो-कॅनेडियन टिक टॉकरच निधन झाल आहे. मेघाच (वय 21) होते. तिच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

आई-वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. या बातमीमुळे तिचे चाहत्यांना आणि मित्र-परिवारालाही मोठाी धक्काच बसला. सोशल मीडियावर तिच्या अचानक जाण्यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. मेघा ठाकुरच्या आई-वडिलांनी पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला कळवावे लागते की आमच्या आयुष्यातील प्रकाश, आमची लाडकी आणि सुंदर मुलगी मेघा ठाकूर अचानक आम्हाला सोडून गेली आहे.

तिच्या जाण्यामुळे सर्वांनाच धक्कादायक आहे. (दि. 24) नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी तिचं निधन झालं. ‘मेघा एक आत्मविश्वासू आणि स्वतंत्र मुलगी होती. आम्हा सर्वांना तिची खूप आठवण येईल. तिचे तिच्या चाहत्यां वरखूप प्रेम होते आणि तिच्या निधनाची माहिती तुम्हाला मिळावी अशी तिची इच्छा होती. यावेळी आम्ही तुमच्या मेघासाठी आशीर्वाद मागतो. तुमच्या प्रार्थना तिला तिच्या पुढील प्रवासात साथ देतील.

मेघाचे आई-वडील.’ मेघा ठाकूर वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी होती. ती सोशल मीडियावर बॉडी पॉझिटिव्हिटीचा प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध होती. जुलै 2022 मध्ये मेघाने तिला हृदयविकाराचा झटका आल्याची पोस्ट शेअर केली होती. यामागचे कारण तणाव आणि चिंता असल्याचं तिनं म्हटलं होतं. दरम्यान, मेघा ठाकूरच्या कुटुंबीयांनी अद्याप तिच्या मृत्यूचे कारण सांगितलेले नाही. त्यांचे अंत्यसंस्कार 29 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी ब्रॅम्प्टन, ओंटारियो येथे झाले.

मेघा ठाकूरचे कुटुंब मध्य प्रदेशातील इंदूरचे आहे. जेव्हा ती एक वर्षाची होती, तेव्हा ती तिच्या कुटुंबासह कॅनडाला गेली. सध्या तिचे चाहते खूप दुःखी असून तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तिच्या जुन्या पोस्टवर जाऊन कमेंटही करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago