महाराष्ट्र

बारामतीत २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती (पुणे): प्रेमसंबंधातून झालेल्या कथित फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील रुई बयाजीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, बारामती) असे आहे. याप्रकरणी त्याचे मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सृष्टी विकास मते, श्रृती विकास मते आणि विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पाच वर्षांचे प्रेमसंबंध; नंतर लग्नास नकार

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम आणि आरोपी सृष्टी मते यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सुरुवातीला लग्नाचे आश्वासन देण्यात आले; मात्र नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे कारण देत लग्नास नकार देण्यात आला.

२७ डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिची बहीण श्रृती यांनी विक्रमला सतत फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेलिंग सुरू केल्याचा आरोप आहे.

पुण्यात बोलावून धमकी

५ जानेवारी रोजी विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपी सृष्टीचे वडील विकास मते यांनीही विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सुसाईड नोटमध्ये छळाचा उल्लेख

१५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७:४५ दरम्यान विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत, “आई मला माफ कर… मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे,” असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी सुसाईड नोट, कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल डेटा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

23 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago