महाराष्ट्र

राज्यात पाच वर्षांत ६७५ बिबट्यांचा मृत्यू; पुणे विभागात सर्वाधिक

पुणे: राज्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक कारणे, रस्ते अपघात, विहिरीत पडणे, विजेचा धक्का तसेच शिकारीमुळे तब्बल ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृत्यूंपैकी सर्वाधिक १८१ बिबट्यांचे मृत्यू पुणे वन विभागात झाले असून नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वन विभागाकडून विविध उपाययोजना राबवूनही बिबट्यांचे मृत्यू तसेच बिबट्यांमुळे होणारी मनुष्यहानी कमी करण्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. याच कालावधीत राज्यात १८७ वाघांचाही विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडे केलेल्या अर्जातून ही माहिती उघड झाली. बिबट्यांची संख्या वाढल्याचे कारण देत वन विभागाने जुन्नर परिसरातील ५० बिबटे गुजरातमधील ‘वनतारा’ या वन्यजीव संस्थेकडे हलवले होते.

बिबट्यांसाठी वाढते धोके

मुक्तपणे फिरणारे बिबटे मनुष्यांसाठी तसेच स्वतःसाठीही धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत पुणे विभागातच ५० पेक्षा जास्त बिबटे मृत्यूमुखी पडले आहेत.

जंगलांना जोडणारे वनपट्टे कमी होत चालल्यामुळे बिबट्यांना अन्न, पाणी किंवा नवीन अधिवासाच्या शोधात रस्ते ओलांडावे लागतात. तसेच ३० पेक्षा जास्त बिबटे उघड्या विहिरींमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्याचेही नोंद आहे. शेतातील कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या ताराही बिबट्यांसाठी प्राणघातक ठरत आहेत.

२०२५ हे संघर्षाचे वर्ष

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात मानवी हल्ल्यांत पाच जणांचा मृत्यू

संघर्ष रोखण्यासाठी ६८ बिबट्यांना पकडण्यात आले

माणिकडोह बचाव केंद्र भरल्यामुळे ५० बिबटे गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवले

बिबट्यांच्या मृत्यूची प्रमुख कारणे

गाव आणि उपनगरांपर्यंत वाढलेले रस्त्यांचे जाळे

डांबरी रस्त्यांमुळे वाहनांचा वाढलेला वेग

रात्री प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या

वन्यप्राण्यांच्या हालचालींवर वाढलेले निर्बंध

शेतातील उघड्या विहिरींमध्ये पडून होणारे मृत्यू

राज्यातील बिबट्यांचे वर्षनिहाय मृत्यू

२०२१ – १६७

२०२२ – १४०

२०२३ – ७७

२०२४ – १४४

२०२५ – १३७

२०२६ – १० (जानेवारी अखेरपर्यंत)

मृत्यूंचे कारणानुसार चित्र

नैसर्गिक कारणे – ३२०

रस्ते अपघात व इतर अपघात – १९८

शिकारी – १७

विजेचा धक्का – १२

पाच वर्षांत नाशिक विभागात १६१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. एकूणच पाहता राज्यात वाघांच्या तुलनेत बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण तिपटीहून अधिक असल्याचे दिसून येते.

जुन्नर वन विभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस म्हणाल्या की, जंगलांचे तुकडे होणे आणि वनपट्टे कमी होणे यामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा येत आहेत. अन्न-पाणी किंवा नवीन अधिवासाच्या शोधात त्यांना रस्ते ओलांडावे लागते. वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी यासाठी अनेक ठिकाणी फलक लावले असले तरी वेगामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

18 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

18 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

18 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

18 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

18 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago