महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ, ही मतचोरीच आहे

मतचोरीची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुलजी गांधी यांनी सातत्याने या मतचोरीचे प्रकरण लावून धरले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढल्याचे उघड झाले आहे. भाजपाची मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदारयादीत अवघ्या ५ महिन्यांत ८% वाढ झाली आहे, काही बूथवर ही वाढ २०-५०% झालेली दिसत आहे. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे बीएलओंनी नोंदवले आहे पण निवडणूक आयोग मात्र गप्प असून ही मतचोरीच आहे म्हणूनच काँग्रेस पक्षाने मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी केलेली आहे.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या भाजपा युतीला अवघ्या पाच महिन्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय कसा मिळू शकतो, हाच कळीचा प्रश्न आहे. या पाच महिन्यात भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदारयाद्यात घोळ केला, मतदानाची संख्या वाढवली. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर झालेले मतदान व दुसऱ्या दिवशी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यात तब्बल ८ टक्क्यांची तफावत आहे. हे मतदान कसे वाढले, याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही. उलट आता माहितीच देता येणार नाही असा नियम बनवला तसेच ४५ दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निर्णयही घेतला आहे. हे सर्व मतचोरी लपवण्याचा प्रकार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago