महाराष्ट्र

अजित पवारांच्या अंत्यस्थळावरच भव्य स्मारक; शरद पवार भावुक, विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. बारामती एमआयडीसी येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता.

विद्या प्रतिष्ठानच्या भव्य शैक्षणिक संकुलाच्या उभारणीत अजित पवार यांचे मोठे योगदान होते. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून हे संपूर्ण संकुल पूर्ण करून घेतले होते. त्यामुळे या परिसराशी त्यांची भावना आणि नाळ घट्ट जोडलेली होती.

अजित पवार यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला. अपघाताच्या दिवशीच सायंकाळी प्रतिक्रिया देताना शरद पवार अत्यंत भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता आणि शब्द फुटेनासे झाले होते. त्या दिवसापासून शरद पवार बारामतीतच थांबले होते.

आज मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी शरद पवार यांनी थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाला भेट दिली. अजित पवार यांच्या अंत्यस्थळाकडे पाहताच ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवार यांच्या स्मारकाबाबत सविस्तर चर्चा केली.

किरण गुजर यांनी सांगितले की, ज्या विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलासाठी अजित दादांनी दिवस-रात्र एक करून काम केले, त्याच मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याच आठवणी जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा ठसा कायम ठेवण्यासाठी याच ठिकाणी अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारक ज्या जागेवर उभारले जाणार आहे, त्या ठिकाणी शरद पवार यांनी पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र येणाऱ्या काळात स्मारकाच्या रूपाने अजित पवार हे बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव जिवंत राहणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago