महाराष्ट्र

पवार परिवारात बदलाचा क्षण! अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना

मुंबई: बारामतीतील अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. शपथविधी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडली, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अजित पवारांकडे असलेली नियोजन आणि वित्त ही खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीसाठी प्रस्थान केले. त्यांनी मुंबईतून निघण्यापूर्वी काटेवाडी येथील अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली. भेटीबद्दल त्यांनी सांगितले की, “उद्या बजेट सेशन आहे, त्यामुळे मी आशाकाकींना भेटायला गेले. आशाकाकींची परवानगी घेतली आणि आज मी दिल्लीसाठी निघालो.”

मुंबईतील सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आणि शरद पवार यांची उपस्थिती नसल्याबाबत प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी हात जोडून फक्त “राम कृष्ण हरी” अशी प्रतिक्रिया दिली.या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आगामी काळात राज्यातील राजकारणात कसा प्रभाव टाकतो, हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago