मनोरंजन

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि रहस्याचा थरारक खेळ; झी ५ वरील ‘देवखेळ’ वेबमालिकेचा वेध

मुंबई: ‘दशावतार’सारख्या चित्रपटानंतर कोकणातील कला, परंपरा, धार्मिक प्रथा आणि तिथल्या गूढ वातावरणावर आधारित कथा वेबमालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून सातत्याने समोर येत आहेत. मात्र या प्रवाहात अनेकदा कोकणी संस्कृतीबाबत गैरसमज पसरवले जातात किंवा आशयात तोचतोचपणा दिसून येतो. अशा पार्श्वभूमीवर झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘देवखेळ’ ही वेबमालिका वेगळी ठरते.

कोकणातील गुहागरजवळील देवतळी या काल्पनिक गावात घडणाऱ्या या कथेचा केंद्रबिंदू आहे शंकासुर आणि त्याच्याशी जोडलेली भीती, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. शिमग्याच्या सणादरम्यान दरवर्षी गावात होणाऱ्या खुनांच्या घटनांना शंकासुराची शिक्षा मानली जाते. पंधरा वर्षांपासून सुरू असलेलं हे हत्यासत्र गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा भाग बनलेलं असतं.

याच गावात नव्याने नियुक्त झालेला पोलीस अधिकारी विश्वास सरंजामे (अंकुश चौधरी) या प्रकरणाचा तपास हाती घेतो. शिमग्याच्या काळात देवतळीमध्ये पोलीस बंदोबस्त नको, हा गावकऱ्यांचा हट्ट आणि त्यानंतरही घडणारी हत्या या सगळ्यामुळे रहस्य अधिक गडद होत जातं. शंकासुर खरंच शिक्षा देतो की या सगळ्यामागे मानवी पाप, स्वार्थ आणि कटकारस्थान दडलेलं आहे, याचा शोध म्हणजे ‘देवखेळ’.

दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड यांनी ही कथा अत्यंत संयमित आणि प्रभावीपणे मांडली आहे. कोकणाचं सौंदर्य, गावातील वातावरण, परंपरा आणि उत्सव यांचं वास्तवदर्शी चित्रण मालिकेला वेगळं परिमाण देतं. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा नेमकी कुठे आहे, हा प्रश्न मालिका ठळकपणे उपस्थित करते.

अभिनयाच्या बाबतीत अंकुश चौधरी यांनी साकारलेला विश्वास सरंजामे विशेष लक्ष वेधतो. नायकत्वाचा दिखावा न करता शांत, तत्त्वनिष्ठ आणि ठाम भूमिका त्यांनी प्रभावीपणे उभी केली आहे. प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, मंगेश देसाई, वीणा जामकर यांच्यासह काही नव्या कलाकारांनीही मालिकेत ताजेपणा आणला आहे. पार्श्वसंगीत आणि गूढ वातावरण निर्मितीही कथेला पूरक ठरते.

शेवटाकडे कथा थोडी गोंधळते, काही प्रश्न अनुत्तरित राहतात, तरीही अंधश्रद्धेवर थेट आणि रंजक भाष्य करणारी ‘देवखेळ’ ही वेबमालिका एक वेगळा अनुभव देणारी ठरते. कोकणाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या रहस्यमय कथांमध्ये रस असणाऱ्यांसाठी ही मालिका पाहण्यासारखी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

7 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

7 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

7 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

7 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

7 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

8 तास ago