महाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या जल्लोषात विकासाची गुढी उभारण्याचा संकल्प; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: गुढीपाडव्याच्या मंगलमय निमित्ताने ठाणे शहरात पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि प्रगतीची गुढी उभारण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन केले.

कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेत ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, फुलांचा सुगंध आणि उत्साहाने भारलेले वातावरण यामुळे संपूर्ण शहरात सणाचा जल्लोष अनुभवायला मिळाला.

शोभायात्रेतील विविध सामाजिक संस्था, शाळा, बँका आणि सांस्कृतिक मंडळांनी सादर केलेले चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरले. पर्यावरण संवर्धन, अवयवदान, आयुर्वेद, संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य यांसारख्या विषयांवर प्रभावी संदेश देत या चित्ररथांनी समाजप्रबोधन साधले. लहानग्यांच्या मल्लखांब आणि कसरतींच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली.

या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले, “शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करून त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेणे हा शासनाचा निर्धार आहे. सामान्य नागरिकांच्या स्वप्नांना बळ देत त्यांच्या आयुष्यात समृद्धीची नवी पहाट उगवावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

ठाण्यातील गुढीपाडव्याची ही शोभायात्रा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारी परंपरा असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाने ठाणेकरांमध्ये ऐक्य, अभिमान आणि सकारात्मकतेची भावना अधिक दृढ केली.

दरम्यान, टेंभी नाका येथील आनंद आश्रमातही गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. येथे शिंदे यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आले तसेच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago