महाराष्ट्र

अंधेरीतील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार; मंत्री उदय सामंत

मुंबई: अंधेरी (पश्चिम) ‘के’ प्रभागातील मोगरा नाल्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबईतील अंधेरी (पश्चिम) ‘के’ प्रभागातील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामाबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री रणजित कांबळे, अशोक चव्हाण, योगेश सागर, अमित साटम, नाना पटोले, सुनील प्रभू, डॉ.भारती लव्हेकर, आशिष शेलार, राम कदम, वर्षा गायकवाड, यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, मोगरा नाल्यावर झालेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून या परिसरात पाणी साचणार नाही. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

5 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

5 तास ago