महाराष्ट्र

आत्महत्येच्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे

डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिस यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम २(क) आणि २(ख) आता प्रकरणात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही महत्त्वाची कारवाई शक्य झाली.

नेहा पवार यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कौमार्य चाचणी आणि अंधश्रद्धेचा थेट उल्लेख होता. तरीही सुरुवातीच्या एफआयआरमध्ये या मुद्द्यांचा समावेश नव्हता. त्यानंतर अंनिसने पोलिसांना निवेदन देऊन जादूटोणा विरोधी कायद्याची लागू कलमे तातडीने लावण्याची मागणी केली. तसेच डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कठोर कारवाईची विनंती केली.

यानंतर तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे सुपूर्त झाली. तपासादरम्यान आरोपीच्या घरातून जादूटोणेसाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांना मिळाले. तसेच चिठ्ठीत नमूद केलेली कौमार्य चाचणी—जी २०१९ मध्ये गृह विभागाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा घोषित केली आहे—ही बाबही तपासासाठी महत्त्वाची ठरली.सर्व पुराव्यांचा विचार करून पोलिसांनी संबंधित जादूटोणा विरोधी कलमे जोडली. न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या निर्णायक कारवाईबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नीलम गोऱ्हे आणि नाशिक पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago