आरोग्य

युरिक ॲसिड वाढलेलं असेल तर थंडीत अजिबात खाऊ नका ३ भाज्या, अजून वाढेल त्रास

थंडीला सुरूवात होताच अनेक लोकांना सांध्यांच्या दुखण्याची समस्या त्रास देऊ लागते. या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण काही वेळा चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढते. खासकरून युरिक अ‍ॅसिड वाढलं असलेल्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हव. जेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिडची लेव्हल वाढते, तेव्हा ते मूत्राद्वारे बाहेर निघत नाही आणि सांध्यांमध्ये साचू लागतं. यामुळे सुज, वेदना आणि कडकपणा वाढतो. चला जाणून घेऊया की युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी थंडीच्या हंगामात कोणत्या गोष्टी टाळाव्यात.

पालक

युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी आपल्या आहारात पालकाचं जास्त प्रमाण टाळावं. पालकात प्युरिन मोठ्या प्रमाणात असतं, जे शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढवतं. त्यामुळे सांध्यातील वेदना आणि सूज वाढू शकते.

मटार आणि बीन्स

थंडीच्या दिवसात घराघरात मटार आणि बीन्सच्या भाज्या बनतात, पण युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांसाठी या भाज्या टाळणं चांगलं. या भाज्यांमध्येही प्युरिनचं प्रमाण जास्त असल्याने त्यांचं सेवन केल्याने सांधेदुखी वाढू शकते.

वांगी

थंडीत वांग्याचं भरतं सगळ्यांनाच आवडतं, पण युरिक अ‍ॅसिड असणाऱ्यांनी वांग्याचं सेवन टाळावं. वांग्यातही प्युरिन असतं, ज्यामुळे शरीरात दुखणे, सूज आणि कडकपणा वाढण्याची शक्यता असते. युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी पाणी पुरेसं प्यावं, जेणेकरून अ‍ॅसिड शरीरातून बाहेर निघेल. तेलकट, मसालेदार आणि रेड मीटसारख्या पदार्थांचं सेवन टाळा. नियमित हलका व्यायाम आणि चालणे सांध्यांसाठी फायदेशीर ठरतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago