मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
यापूर्वी पक्षाने महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर दुपारी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष म्हणून ॲड. चिन्मय गाढे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
ॲड. चिन्मय गाढे हे २००९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी नाशिक विद्यार्थी शहराध्यक्ष, युवक शहर कार्याध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशी विविध पदे सांभाळली आहेत. त्यांच्या संघटनात्मक अनुभवाची दखल घेत त्यांच्यावर विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…