महाराष्ट्र

EpsteinFiles प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ राजीनामा द्यावा; झीनत शबरीन

मुंबई: EpsteinFiles मधील धक्कादायक खुलासे आणि या प्रकरणाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जोडले जाणे हे भारतासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचा आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला आहे. या प्रकरणामुळे भारत सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

या प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन शेख, पंकज चौधरी, सरचिटणीस अब्दुल समद, अजय मिश्रा, अमनदीप सैनी, तेजस चांदुरकर, दक्षिण मुंबई युवक जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवक जिल्हाध्यक्ष फरहान मन्सुरी यांच्यासह युवक काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, एपस्टीन प्रकरणाचा वापर भारताच्या धोरणांवर दबाव आणण्यासाठी करण्यात आला होता का, हा गंभीर प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या वैयक्तिक प्रतिमा आणि राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या दीर्घकालीन धोरणात्मक हितांशी तडजोड करत आहेत का, याचे उत्तर देशाला मिळाले पाहिजे.

जर सरकारचे निर्णय स्वतंत्र, संस्थात्मक आणि राष्ट्रीय हिताचे असतील, तर परराष्ट्र धोरण, ऊर्जा आणि सुरक्षेशी संबंधित निर्णय कोणत्या आधारावर, कोणत्या प्रक्रियेतून आणि कोणाच्या फायद्यासाठी घेण्यात आले, याबाबत सरकारने तात्काळ स्पष्टता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

#EpsteinFiles मधून समोर आलेल्या माहितीमुळे भारत सरकारची कार्यपद्धती, परराष्ट्र धोरण आणि निर्णयप्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप शबरीन यांनी केला. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांना एका कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची मदत मिळाल्याचे उल्लेख, तसेच अमेरिकेतील सत्ताकेंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी उद्योगपतींची भूमिका, हे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि संस्थात्मक राजनैतिक व्यवस्थेवर थेट आघात करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर सरकारचे अलीकडील धोरणात्मक निर्णय अधिक संशयास्पद वाटत असल्याचे सांगत, रणनीतीदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदर प्रकल्पाला कमकुवत करणे, रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त ऊर्जा पर्यायांपासून माघार घेणे आणि भारताचे ऊर्जा धोरण अमेरिकन हितसंबंधांनुसार समायोजित करणे, हे निर्णय राष्ट्रीय हितांपेक्षा बाह्य दबावाचे निदर्शक असल्याचा आरोपही त्यांनी केला.या सर्व बाबींवर सरकारने संपूर्ण व पारदर्शक खुलासा करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट मत झीनत शबरीन यांनी व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

10 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

11 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

11 तास ago