महाराष्ट्र

पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे अजित पवरांनी केले कौतुक

मुंबई: नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड आणि सध्या पूणे तर, प्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद अजितदादांकडेच असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदे, कु. रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव MIDC मधील धोकादायक कचरा दिवसाढवळ्या जाळला जात असताना MPCB चे अधिकारी धृतराष्ट्राच्या भुमिकेत…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या कडेला असणाऱ्या रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, सोनेसांगवी, कारेगाव, बाभुळसर…

5 तास ago

प्लेटलेट्स म्हणजे काय

हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील…

6 तास ago

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अटींचा डोंगर, कुंभमेळ्याच्या इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी!

विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात; “दोन दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही का?”…

6 तास ago

तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगते जिभेचा रंग

जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.…

7 तास ago

गुनाटमध्ये भरधाव मोटारसायकलची शाळकरी मुलाच्या सायकलला पाठीमागून धडक; बालक गंभीर जखमी…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : गुनाट ते शिंदोडी रस्त्यावर भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकल चालविणाऱ्या चालकाने सायकलवरुन…

8 तास ago

शिरूर! मलठणमध्ये अष्टविनायक महामार्गावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

मलठण (सुनिल जिते) : अष्टविनायक महामार्गावर भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दोन…

8 तास ago